
Pranitha Subhash: 'पतीचे ताटात पाय, पत्नी करतेय पुजा!' अभिनेत्री वादात
Pranitha Trolled: अभिनेत्री प्रणिथा सुभाष ही आता वादात अडकल्याचे दिसते आहे. तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरुन काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. एका धार्मिक विधीचे पालन करताना त्यात (Tollywood Actress) सांगितल्यानुसार केलेल्या त्या कृतीचा फटका तर प्रणिथाला बसत नाही ना, असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतो आहे. काही नेटकऱ्यांनी तिची बाजू घेतली आहे. तर काहींनी तिलाच प्रतिप्रश्न करत सत्य काय आहे अशी (Social Media Viral News) विचारणा केली आहे. भीमा अमावस्या पूजेचा फोटो प्रणिथानं शेयर केला होता. त्यावरुन एवढा वाद होईल असे तिला वाटलेही नव्हते.
अभिनेत्रीला आपण ट्रोल होत असल्याचे लक्षात येताच तिनं एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये ती म्हणते, मी एक अभिनेत्री आहे. याचा अर्थ असा नव्हे की, आपल्या संस्कृतीतील गोष्टींचे पालन करताना देखील नाटकीपणा आणणे. जी गोष्ट श्रद्धापूर्वक आणि मनापासून करणं गरजेचं आहे ती तशीच करायला हवी. असे मला वाटते. ट्रोलर्स सगळ्या गोष्टींचा बारकाईनं विचार करत नाही. जो फोटो शेयर केला आहे त्यामागील अर्थ, भावना काय याचाही आपण विचार करणार आहोत की नाही, असा प्रश्न प्रणिथाने विचारला आहे. ई टाईम्सनं दिलेल्या एका बातमीमध्ये हा उल्लेख आला आहे.
भीमा अमावस्याची पूजा करताना त्यामागील उद्देश हा पतीचे दीर्यायुष्य असे आहे. याशिवाय अविवाहित मुली आपल्याला चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत करत असतात. काहींनी प्रणिथाच्या त्या फोटोंवरुन मातृसत्ताक विरुद्ध पितृसत्ताक असा वाद सुरु केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याकडे पितृसत्ताक पद्धती कशाप्रकारे सुरु आहे याविषयी वेगवेगळी उदाहरणं दिली आहे. त्यावर प्रणिथानं दिलेल्या प्रतिक्रियेनं लक्ष वेधून घेतले आहे.
हेही वाचा: Video: 'आई कुठे काय करते' या मालिकेतील मंगळागौर
प्रणिथा म्हणते, आयुष्याला दोन बाजू असतात. बहुतांशी लोकं तुमच्या बाजूनं असतात. तर काही नसतात. त्यामुळे कुणाचा किती विचार करायचा हे आपल्याला ठरवता आले पाहिजे. मी आता काही गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिकले आहे. तसे न केल्यास आपल्याला त्याचा मानसिक त्रास होतो. त्यातून सुटका करुन घ्यायची असेल तर फारसा विचार करायचा नाही. असे मला वाटते. आधुनिक स्त्री म्हणून तुम्ही आपल्या परंपरेचे पालनच करायचे नाही. असं नाही. अशी गोष्टही प्रणिथानं यावेळी सांगितली.
हेही वाचा: Video: 'आप्पी आमची कलेक्टर' नवीन मालिका
Web Title: Tollywood Actress Pranitha Trolled Husband Photo Bheema Amavasya Follow Traditions
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..