esakal | टॉलिवूड ड्रग्ज प्रकरण : राणा दग्गुबतीची तब्बल 7 तास चौकशी
sakal

बोलून बातमी शोधा

rana dagubatti

टॉलिवूड ड्रग्ज प्रकरण : राणा दग्गुबतीची तब्बल 7 तास चौकशी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : चार वर्षे जुन्या ड्रग्ज प्रकरणी आणि त्यातून झालेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी टॉलिवूडचा (tollywood) प्रसिद्ध अभिनेता राणा दग्गुबती (rana dagubatti) बुधवारी (ता.८) ईडीसमोर सकाळी १० वाजता हजर झाला. त्याची तब्बल सात तास चौकशी सुरू असल्याचे समजते. ईडीसमोर हजर होणारा राणा हा पाचवा टॉलिवूड सेलिब्रिटी आहे.

12 जणांना नोटिसा, 5 जणांची चौकशी

ईडीने मागील महिन्यात एलएसडी आणि एमडीएमएसह 'क्लास ए' ड्रग्ज तस्करीशी संबंधित प्रकरणात मनी लाँड्रिंग चौकशीचा भाग म्हणून टॉलिवूडशी संबंधित 10 लोकांना आणि एका खासगी क्लब व्यवस्थापकासह इतर दोघांना नोटिसा बजावल्या होत्या. दिग्दर्शक पुरी जगन्नाथ, अभिनेत्री चार्मी कौर, रकुल प्रीत सिंग आणि नंदू यांची 31 ऑगस्टपासून चौकशी करण्यात आली आहे. ईडीने ड्रग्ज प्रकरणी रवी तेजा, नवदीप, मुमैथ खान, तनिश आणि रवी तेजाचा चालक श्रीनिवास यांनाही समन्स बजावले आहे. ईडीच्या अधिका-यांनी 3 सप्टेंबर रोजी अभिनेत्री रकुल प्रीत हिची पाच तास चौकशी केली होती. तर पुरी जग्गनाथ याला 31 ऑगस्ट रोजी चौकशीसाठी बोलावले होते. याप्रकरणी चार्मी कौर हिची देखील 2 सप्टेंबर रोजी चौकशी झाली होती. मंगळवारी नंदूची आठ तास चौकशी करण्यात आली. या प्रकरणातील प्रमुख आरोपी केल्विन मिस्करेनहास आणि इतर दोघांचीही मंगळवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने रकुलप्रीत, राणा दग्गुबातीसह 12 जणांना नोटिसा पाठवल्या होत्या.

हेही वाचा: करीनाने जाणीवपूर्वक पुस्तकात केला शरीरसंबंधांचा उल्लेख कारण...

11 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल

2017 मध्ये तेलंगणा राज्य उत्पादन शुल्क विभागाने 30 लाख किंमतीचे ड्रग्ज जप्त केल्यानंतर 12 गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणात अनेक अंमली पदार्थ तस्करांना अटक करण्यात आली, त्यापैकी 11 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा: नवरा सोबत नाही, गणेशोत्सव साजरा करणारी शिल्पा शेट्टी ट्रोल

loading image
go to top