esakal | नवरा सोबत नाही, गणेशोत्सव साजरा करणारी शिल्पा शेट्टी ट्रोल
sakal

बोलून बातमी शोधा

  shilpa shetty ,raj kundra

नवरा सोबत नाही, गणेशोत्सव साजरा करणारी शिल्पा शेट्टी ट्रोल

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) यंदा गणेशोत्सव (ganeshutsav) साजरा करत असली, तरी ती तिच्या व्यक्तीगत आयुष्यात संकटांचा सामना करतेय. पती राज कुंद्रा (raj kundra) पॉर्नोग्राफी प्रकरणात तुरुंगात आहे. राज कुंद्राने अनेकदा जामिनासाठी अर्ज केलाय. पण प्रत्येकवेळी त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai police) पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राला मुख्य कारस्थानकर्ता ठरवलं आहे. मुंबई पोलिसांच्या मते, राज कुंद्रामध्ये साक्षीदारांना प्रभावित करण्याची तसेच तो लंडनला पळून जाण्याची शक्यता आहे.

शिल्पा शेट्टीने या प्रकरणातून स्वत:ला सावरत पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. तिच्या आयुष्याची गाडी हळूहळू रुळावर येतेय. शिल्पा शेट्टी दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करते. गणपतीत राज कुंद्रा आणि ती नेहमी सोबत दिसतात. यंदाही ती राज कुंद्राच्या अनुपस्थितीत गणेशोत्सव साजरा करतेय. तिनं लालबागमधून गणेशाची मुर्ती घरी आणली आहे.

हेही वाचा: शत्रुच्या हवाई हल्ल्याआधीच मिळणार माहिती, DRDO IAF साठी बनवणार खास जेट

यंदाही शिल्पाने गणपतीची मुर्ती घरी आणल्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लगेच तिला ट्रोल करण्यात आले. नवरा तुरुंगात असताना ती गणेशोत्सव साजरा करतेय म्हणून तिला ट्रोल करण्यात येतय.

हेही वाचा: देशातील बारा प्रसिद्ध गणपती मंदिरं पाहिलीत?

एका युझरने मिस्टर कुंद्रा कुठे आहेत? असा प्रश्न तिला विचारला. दुसऱ्या युझरने नवऱ्याला तर येऊं दे, असे म्हटले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. एका युझरने शिल्पाला टॅग करत 'चूक माफ केली जाऊ शकते, तू तुझ्या नवऱ्याला बाहेर काढं' असे लिहिले आहे. या सगळ्यामध्ये काही चाहत्यांनी तिचे समर्थनही केले आहे. तिचे बळ आणि भक्तीचे कौतुक केलेय.

loading image
go to top