RRR: 'रोल छोटा मानधनाचा आकडा मोठा': अजय-आलियानं घेतले एवढे कोटी | Tollywood movie RRR ss rajamauli Ajay Devgn aliyah Bhatt fees | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RRR Movie
RRR: 'रोल छोटा मानधनाचा आकडा मोठा': अजय-आलियानं घेतले एवढे कोटी

RRR: 'रोल छोटा मानधनाचा आकडा मोठा': अजय-आलियानं घेतले एवढे कोटी

RRR Starcast Fees: कोरोनानं (Omicron) मध्ये डोकं वर काढलं नसतं तर आता बहुसंख्य प्रेक्षक आरआरआर (RRR Movie) हा चित्रपट थिएटरमध्ये पाहत असते. मात्र ते शक्य झालं नाही. राज्य सरकारनं नवे निर्बंध आणले. त्याचा फटका मनोरंजन क्षेत्राला (Entertainment) बसला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ज्या चित्रपटाची प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे त्या आरआरआर चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांची निराशा झाली आहे. त्याची नवी तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

यासगळ्यात बॉलीवूडच्या (Bollywood Movies) दोन कलाकारांची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे. त्यामध्ये अजय देवगण (Ajay Devgn) आणि आलिया भट्ट (aliyah bhatt) यांनी आरआरआरमध्ये (RRR Cameo) कॅमिओ केला आहे. या चित्रपटामध्ये त्यांनी घेतलेल्या मानधनाची चर्चा आहे. सोशल मीडियावर आरआरआरचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. नेहमीप्रमाणे त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यामध्ये अजय देवगण आणि आलियाच्या रोलचं कौतूक प्रेक्षकांनी केलं आहे. आलिया आणि अजयनं आरआरआरसाठी मजबूत मानधन घेतल्याची चर्चा आहे. त्याचा आकडा ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

हेही वाचा: Movie Review: नादखुळा 'पुष्पा'!, कडक समंथा, भडक अल्लु अर्जुन

अजय आणि आलियाची आरआरआरमध्ये फार मोठी भूमिका नाही. मात्र त्यांच्या स्टारडममुळे त्यांना मोठ्या प्रमाणात मानधन देण्यात आले आहे. आलियानं सीतेची भूमिका साकारली आहे. साधारण तिची भूमिका 20 मिनिटांची असल्याची चर्चा आहे. मात्र त्या भूमिकेसाठी तिला 9 कोटी रुपये मिळाले आहेत. असे सांगितलं गेले आहे. अजय देवगणनं 35 कोटी रुपयांचे मानधन घेतल्याची चर्चा आहे. आरआरआरच्या माध्यमातून अजय आणि आलिया हे दोघेही टॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.

हेही वाचा: RRR Movie: प्रदर्शनापूर्वीच सापडला कायद्याच्या कचाट्यात

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top