Movie Review: नादखुळा 'पुष्पा'!, कडक समंथा, भडक अल्लु अर्जुन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Allu Arjun and Rashmika Mandanna Pushpa Review
Movie Review: नादखुळा 'पुष्पा'!, कडक समंथा, भडक अल्लु अर्जुन

Movie Review: नादखुळा 'पुष्पा'!, कडक समंथा, भडक अल्लु अर्जुन

साऊथचे मुव्ही पाहायला जाताय तर एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे थोडावेळ आपली तार्किकता बाजुला ठेवायची. आपण तीन तास फक्त मनोरंजनाच्या हिशोबानं ती त्या कलाकृतीचा आनंद घेण्यासाठी जात आहोत. त्याचा फार बारकाईनं अभ्यास करण्याची गरज नाही. एवढं एकदा का मनाला बजावून ठेवलं की, मग साऊथचे मुव्ही जबरदस्त मनोरंजन करतात. त्याला काही तोड नाही. त्यामुळे आपली निराशा होणार नाही. अल्लु अर्जुन आणि समंथाच्या पुष्पाचा ट्रेलरला चाहत्यांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. खासकरुन त्यातील समंथाच्या आयटम साँगला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं होतं. याशिवाय रश्मिकाच्या (Rashmika Mandanna) सामी सामी गाण्यानं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पुष्पा आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर त्यांची उत्सुकता संपली आहे. अल्लु अर्जुनच्या (Allu Arjun) पुप्षानं कमाल केली आहे. ज्यांना अॅक्शन, थरार, मारधाड पटांमध्ये रस आहे त्यांनी पुष्पा जरुर पाहावा. आंध्रप्रदेशातातील एका छोट्या गावामध्ये सुरु होणारी पुष्पाची कथा प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेते. पकड घेणारं कथानक, त्याला साजेसं असं छायाचित्रण, प्रभावी संवाद, आणि गुंगवून टाकणारं संगीत या पुष्पाच्या जमेच्या बाजू म्हणता येईल. (Allu Arjun and Rashmika Mandanna Pushpa Review)

गेल्या काही महिन्यांपासून जर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांकडे लक्ष दिल्यास त्यातील दाक्षिणात्य सिनेमांकडे प्रेक्षकांचा ओढा जास्त असल्याचे दिसून आले आहे. मग तो रजनीकांत (rajnikanth) याचा अन्नाथे असो किंवा आता आलेला मडी असो... या चित्रपटांनी प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. त्याला मोठा प्रतिसादही मिळाला आहे. जय भीमनं (Jay Bhim) तर आयएमडीबीवर आतापर्यतची सर्वाधिक रेटिंग मिळवत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली. त्यामध्ये अभिनेता सुर्यानं प्रमुख भूमिका साकारली होती. पुष्पाच्या बाबत बोलायचे झाल्यास अल्लु अर्जुनच्या हटक्या लुकनंच प्रेक्षक भारावून जातात. त्याची हटके स्टाईल, त्याचे संवाद, अॅक्शन यामुळे तो प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. पुष्पा कमालीच्या वेगानं आपल्यासमोर येत मनाची पकड घेतो.

Allu Arjun and Rashmika Mandanna Pushpa movie Review

Allu Arjun and Rashmika Mandanna Pushpa movie Review

कथेच्या बाबत सांगायचे झाल्यास पुष्पाची कथा ही आंध्रप्रदेशातील घनदाट अरण्यापासून सुरु होते. त्या जंगलामध्ये चंदनाची मोठ्य़ा प्रमाणात तस्करी होत असते. त्यामागे काही बड्या लोकांचा हात आहे. त्यांच्या मेहरबानीनं ते सगळं सुरु आहे. यामध्ये पुष्पराज (अल्लु अर्जुन) यासगळ्यांच्या विरोधात उभा आहे. त्यानं यासगळ्यांना आव्हान दिलं आहे. त्याला काही करुन तस्करी करणाऱ्यांचा बिमोड करायचा आहे. सगळं कथानक त्याच्या भोवती फिरताना दिसतं. यामध्ये रश्मिका मंधाना त्या जंगलात राहणारी सर्वसामान्य मुलगी आहे. जी पुष्पाच्या प्रेमात आहे. चित्रपटामध्ये रश्मिका आणि अल्लु अर्जुनची केमिस्ट्री लक्ष वेधून घेणारी आहे. अल्लुच्या वाट्याला जे अॅक्शन सीन आले आहेत त्यामध्ये त्यानं कमाल केली आहे. त्याचे ते अॅक्शन सीन पाहून त्यानं प्रेक्षकांकडून शिट्ट्या, टाळ्या वसूल केल्या आहेत.

निखळ मनोरंजन या उद्देशानं पुष्पा पाहिल्यास पैसे वसूल असा हा चित्रपट आहे. कथेबरोबरच त्याच्या गाण्यानं प्रेक्षकांना वेडं केलं आहे. दिग्दर्शक सुकुमारनं (sukumar) समंथाला (samantha ruth prabhu) तिच्या पहिल्या आयट्म साँगसाठी साईन केलं. त्याचं चीज झाल्याचं दिसुन आलं आहे. त्या गाण्यामध्ये समंथानं केलेला डान्स भावणारा आहे. अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना, समंथा, फहाद हासिल, सुनील राव रमेश, यांच्या भूमिका प्रेक्षकांना या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत. अडीच तासांच्या या चित्रपटामध्ये टिपीकल टॉलीवूड मसाला पाहायला मिळणार आहे. मात्र तो पाहताना कुठेही रटाळ होणार नाही याची काळजी दिग्दर्शकानं घेतली आहे. त्यात मोठा वाटा संगीतकार देवी श्री प्रसाद यांचा आहे. त्यांनी दिलेलं संगीत आणि गाणी जबरदस्त आहे.

तमिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी या पाच भाषांमध्ये पुष्पा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. बऱ्याच काळानंतर अल्लु अर्जुन एका वेगळ्या भूमिकेतून चाहत्यांसमोर आला आहे. त्याच्या डान्सचे फॅन जगभर पसरले आहेत. पुष्पामध्ये त्याला त्यासाठी फारसा वाव नसला तरी त्यानं आपल्या हटके स्टाईलनं प्रेक्षकांना प्रभावित केलं आहे एवढं मात्र नक्की....

Rating - ***1/2

Web Title: Tollywood Actor Allu Arjun Rashmika Mandanna Pushpa Samantha Movie Review

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..