Oscars 2023: आता ऑस्कर लांब नाय...! आरआरआर आणि 'छेल्लो शो' शॉर्टलिस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Oscars 2023

Oscars 2023: आता ऑस्कर लांब नाय...! आरआरआर आणि 'छेल्लो शो' शॉर्टलिस्ट

यंदाच्या ऑस्कर 2022 साठी भारताचे दोन चित्रपट निवडले गेले आहेत. यामध्ये एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' या चित्रपटासोबतच गुजराती चित्रपट 'छेल्लो शो' म्हणजेच 'लास्ट फिल्म शो' आहे.

आरआरआर या चित्रपटाला ऑस्करच्या 'सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म' श्रेणीत नामांकनासाठी पाठवण्यात आला होता, पण काही कारणास्तव तो निवडला गेला नाही. त्यानंतर, निर्मात्यांनी RRR ला 14 श्रेणींमध्ये नामांकनासाठी पाठवला.

हेही वाचा: Oscars 2023: RRR चा न्यूयॉर्कमध्येही डंका ! ऑस्करसाठी दावा आणखी मजबूत

आपल्या चित्रपटाला ऑस्करमध्ये प्रवेश मिळावा यासाठी राजामौली यांनी खूप मेहनत घेतली होती. आता शेवटी RRR ची 95 व्या अकादमी पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. बुधवारी 10 ऑस्कर श्रेणींसाठी चित्रपटांची शॉर्टलिस्ट जाहीर करण्यात आली. तर 'RRR' चित्रपटातील 'नातू नातू' या गाण्याने संगीत विभागात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

ज्यामध्ये डॉक्युमेंटरी आणि इंटरनॅशनल फीचर्स, डॉक्युमेंटरी शॉर्ट सब्जेक्ट्स, ओरिजिनल स्कोअर यांचाही समावेश आहे. महत्वाची बातमी म्हणजे 'छेल्लो शो' (द लास्ट फिल्म शो), ऑस्करसाठी भारताने पाठवलेल्या चित्रपटाला 'आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म' श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

हेही वाचा: Oscars 2023 Nomination: 'RRR' चा डंका ऑस्करमध्ये वाजणार का?

'RRR'च्या निर्मात्यांनी चित्रपट सादर केलेल्या 14 श्रेणींमध्ये पटकथा, स्कोअर, एडिटिंग, ध्वनी, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि एडिटिंग यांचा समावेश असल्याची माहिती आहे.

ऑस्करसाठी नामांकन मतदान 12 ते 17 जानेवारी दरम्यान होणार आहे. त्यानंतर 24 जानेवारीला उमेदवारी यादी जाहीर होणार आहे. 12 मार्च रोजी हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये 95 वा ऑस्कर सोहळा होणार आहे.