esakal | नागार्जुनचा ‘वाइल्ड डॉग’ आता ओटीटीवर

बोलून बातमी शोधा

tollywood superstar akkineni nagarjuna wild dog

नागार्जुनचा ‘वाइल्ड डॉग’ आता ओटीटीवर

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - दाक्षिणात्य सुपरस्टार अक्किनेनी नागार्जुनचा अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘वाइल्ड डॉग’ हा प्रदर्शित झाला आहे. यापूर्वी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित झाला आहे. त्याविषयीची माहिती निर्मात्यांच्यावतीनं सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. त्या चित्रपटातील प्रमुख अभिनेता नागार्जुननं देखील यासंबंधी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. साऊथमध्ये नागार्जुनचा मोठा फॅन फॉलोअर्स आहेत. त्याच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसादही मोठा आहे. नेटफ्लिक्सवर हा सिनेमा आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्याची माहिती दिली आहे.

यावेळी नागार्जुनं पोस्ट मध्ये कोरोनाच्या परिस्थितीवरही भाष्य केले आहे. त्यानं चाहत्यांना काळजी घेण्याचा सल्लाही दिलायं. नागार्जुननं सांगितलं आहे की, वाइल्ड डॉग नावाचा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित येणार आहे. हा चित्रपट आतंकवादी हल्ल्यावर आधारित आहे. आपण सर्वांनी तो जरुर पाहावा. हैदराबाद मधील दहशतवादी घटनेवर आधारित या चित्रटामध्ये नागार्जुननं एआयएच्या अधिका-याची भूमिका केली आहे.

चित्रपटात नागार्जुनचे नाव वाईल्ड डॉग असे असून त्यात दिया मिर्झानं त्याच्या पत्नीची भूमिका केली आहे. या चित्रपटात नागार्जुनचा धमाकेदार अंदाज पाहायला मिळणार आहे. अहिशोर सोलोमनने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सेयामी खेर, अली राजा, अतुल कुलकर्णी सारखे कलाकारही दिसणार आहे. नागार्जुनच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास यापुढील काळात तो ब्रम्हास्त्र चित्रपटात दिसणार आहे. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करणार आहेत. त्यात महानायक अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्याही भूमिका आहेत.