esakal | टॉम क्रुझचा ट्रेनवरील तो स्टंट ठरतोय भलताच लोकप्रिय; मिशन इम्पॉसिबलच्या 7 आणि 8 व्या भागाचे चित्रिकरण सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

Tom Cruise's daredevil stunt on a moving train Mission Impossible 7 goes viral on the internet

मिशन इम्पॉसिबलच्या चित्रपटातील ते दृश्य सोशल माध्यमांवर व्हायरल होताच त्यावर लाईक्स आणि कमेंटसचा पाऊस पडल्याचे दिसून आले. कोरोनामुळे या दोन्ही भागांचे शुटिंग लांबले होते. त्याच्या या भागात टॉम क्रुझ मुख्य भूमिकेत आहे. ख्रिस्तोफर मॅक्विरीन हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहे.

टॉम क्रुझचा ट्रेनवरील तो स्टंट ठरतोय भलताच लोकप्रिय; मिशन इम्पॉसिबलच्या 7 आणि 8 व्या भागाचे चित्रिकरण सुरु

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - हॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता  टॉम क्रुझचा मिशन इम्पॉसिबल कमालीचा लोकप्रिय झाला. जगभरात सगळीकडे मोठ्या संख्येने तो पाहिला गेलेला चित्रपट आहे. आता या चित्रपटाच्या सातव्या आणि आठव्या भागाचे चित्रिकरण सुरु आहे. त्यातील एका भागाचे चित्रिकरण चालु असताना त्यावेळी तिथुन जाणा-या वाहनचातकाने ते दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केले.

मिशन इम्पॉसिबलच्या चित्रपटातील ते दृश्य सोशल माध्यमांवर व्हायरल होताच त्यावर लाईक्स आणि कमेंटसचा पाऊस पडल्याचे दिसून आले. कोरोनामुळे या दोन्ही भागांचे शुटिंग लांबले होते. त्याच्या या भागात टॉम क्रुझ मुख्य भूमिकेत आहे. ख्रिस्तोफर मॅक्विरीन हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहे. ट्रेनवरील एक फाईट सिक्वेन्स दृश्य चित्रित करण्याचे काम चालु होते. नॉर्वेमध्ये चित्रपटाची टीम त्यासाठी गेली आहे. चित्रपटातील बहुतांशी महत्वाचे प्रसंग त्याठिकाणी चित्रित केले जाणार आहे. तिथे टॉम आणि बॅडीबरोबरच्या लढाईतील काही दृश्य आहेत.  मिशन इम्पॉसिबलच्या सातव्या भागात रिबेका फग्युसन, विंग रेहेम्स आणि सिमॉन पेग यांच्या भुमिका आहेत. हा चित्रपट 19 नोव्हेंबर 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

याविषयी ख्रिस्तोफर मॅक्विरीनने सोशल मीडियावर अधिक माहिती दिली आहे. तो म्हणतो, नॉर्वेमधील निसर्ग आणि त्याची सुंदरता हा चित्रपटातील एक महत्वाचा भाग आहे. ती सुंदरता चित्रपटात येण्यासाठी सर्व टीम प्रयत्नशील आहे. अशक्य ते शक्य करणे हाच तर चित्रपटाचा मुख्य विषय आहे. चित्रपटाचा हा प्रवास यशस्वी व्हावा यासाठी नॉर्वेयिन चित्रपट संस्था, नॉर्वेयिन रेल्वे म्युझियम, तेथील महापालिका यांचे सहकार्य महत्वाचे आहे. मॅक्विरीनने नॉर्वेयिन लोकांचे आभार मानले आहे. त्यांचे प्रेम आणि प्रेरणा याशिवाय हे शक्य नसल्याचे त्याने म्हटले आहे.