'Section 375' चा ट्रेलर रिलीज

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 August 2019

'सेक्शन 375' ह्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रीलिझ करण्यात आला. पॅनोरामा स्टुडिओने निर्मित हा्या चित्रपटाचे दिगदर्शन अजय बहलने केले आहे.

'सेक्शन 375' ह्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रीलिझ करण्यात आला. पॅनोरामा स्टुडिओने निर्मित ह्या चित्रपटाचे दिगदर्शन अजय बहलने केले आहे. या सिनेमामध्ये अक्षय खन्ना, रिचा चड्डा, मीरा चोपरा, राहूल भट हे कलाकार आहेत. हा सिनेमा 13 सपटेंबरला रीलिझ होणार आहे. 

हा ट्रेलर सामान्या मानवी संवेदनाना हात घालतोय. मीरा चोपरा, अंजली वासुदेव डांगळे हे पात्र साकारत असुन, अंजली एक बलात्कार पीडित महिला आहे. रिचा चड्डा आणि अक्षय खन्ना हे वकिलांच्या भुमिकेत असुन त्यांच्यातील मतांचा दुराभास ट्रेलरमध्ये स्पष्ट होत आहे.  ट्रेलरमधुन चित्रपट एक कोर्टरुम ड्रामा सोबत एक सामाजिक संवेदनांवर, सामाजातील काही विक्षिप्त प्रश्नांवर उजेड घालणारा आहे असे स्पष्ट होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: trailer of film section 375 released