'टोटल धमाल'चे धमाल ट्रेलर लॉन्च

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 जानेवारी 2019

धमाल', 'डबल धमाल'नंतर आता पुन्हा एकदा तगड्या स्टारकास्टसह 'टोटल धमाल' मनोरंजनास सज्ज होत आहे.

मुंबई : 'धमाल', 'डबल धमाल'नंतर आता पुन्हा एकदा तगड्या स्टारकास्टसह 'टोटल धमाल' मनोरंजनास सज्ज होत आहे. काल (ता. 21) 'टोटल धमाल'चे हटके ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. अजय देवगण, धकधक गर्ल माधुरी दीक्षित, अनिल कपूर, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफ्री, जॉनी लिव्हर अशा दिग्गज कलाकार मंडळींना घेऊन हा केलेला हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना पोट धरून हसवेल असे ट्रेलरवरून लक्षात येते. 

'धमाल' व 'डबल धमाल'नंतर दिग्दर्शक इंद्र कुमार पुन्हा एकदा कलाकारांची गँग घेऊन 'टोटल धमाल' घेऊन येत आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित खूप दिवसानंतर विनोदी भूमिकेत दिसेल, तर तिला अभिनेता अनिल कपूर यांची विनोदी साथ असेल. तर अर्शद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफ्री या कलाकारांनी त्यांचे धमाल स्वॅग कायम ठेवले आहेत. 

ट्रेलरमुळे धमालच्या चाहत्यांची उत्सुकता उंचावली असून, विनोदप्रेमींचे चित्रपटाकडे लक्ष लागले आहे. 

Web Title: trailer launch of Total Dhamaal