रामगोपाल वर्मा यांच्या 'कोरोना व्हायरस' सिनेमाचा ट्रेलर रिलीज

दिपाली राणे-म्हात्रे
Wednesday, 2 December 2020

रामगोपाल वर्मा यांनी या सिनेमात कशा प्रकारे कोरोना व्हायरसची भिती ख-या आयुष्यात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रेलर रिलीज होताच सोशल मिडियावर धुमाकुळ घालायला सुरुवात केली आहे.

मुंबई- देशभरात कोरोना व्हायरसचं थैमान अजुन सुरुच आहे. अशातंच आता बॉलीवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा त्यांचा आगामी साऊथ इंडियन सिनेमा 'कोरोना व्हायरस' प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच त्यांनी त्यांच्या सोशल मिडियावरुन शेअर केला आहे. रामगोपाल वर्मा यांनी या सिनेमात कशा प्रकारे कोरोना व्हायरसची भिती ख-या आयुष्यात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रेलर रिलीज होताच सोशल मिडियावर धुमाकुळ घालायला सुरुवात केली आहे. या ट्रेलरमधून एका कुटुंबाची कथा मांडण्यात आली आहे. 

हे ही वाचा: आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल यांचा लग्नसोहळा संपन्न, पाहा फोटो  

या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतंय की कोरोनाच्या महारोगराईमध्ये एक कुटुंब सुरुवातीला आनंदी दिसून येतं. मात्र कुटुंबातील एका सदस्याला कोरोना होतो ज्यानंतर कौटुंबिक वातावरण पूर्णपणे बिघडून जातं. घरातील प्रत्येक सदस्य घाबरलेला दिसतोय. जर घरातील एकाला कोरोना झाला तर घरातील इतर सगळ्या सदस्यांची कशी हालत होते हे दाखवण्याचा प्रयत्न राम गोपाल वर्मा यांनी केला आहे. रामगोपाल वर्मा यांचा कोरोना व्हायरस हा सिनेमा ११ डिसेंबरला रिलीज होणार आहे.

कोरोनाच्या संसर्गाविषयी सांगायचं झालं तर जगभरात अमेरिकेनंतर दुसरा नंबर भारताचा लागतोय. देशात अजुनही कोरोनाचं थैमान सुरुच आहे. गेल्या २४ तासात ३६ हजार ६०४ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर देशात एकूण आत्ताच्या घडीला कोरोना रुग्णांची संख्या ९४ लाख ९९ हजार ४१२ वर पोहोचली आहे.     

the trailer of ram gopal varma film corona virus released  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the trailer of ram gopal varma film corona virus released