आदित्य नारायण आणि श्वेता अग्रवाल यांचा लग्नसोहळा संपन्न, पाहा फोटो

दिपाली राणे-म्हात्रे
Wednesday, 2 December 2020

१ डिसेंबर रोजी दोघेही एकमेकांसोबत विवाहबंधनात अडकले. नुकतेच त्यांच्या या दिमाखदार लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल साईट्सवर पाहाला मिळत आहेत. 

मुंबई- आदित्य नारायण आता नवरदेव बनला आहे. अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असलेल्या गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत तो लग्नाच्या बेडीत अडकला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांच्या लग्नांची चर्चा होती. अखेर १ डिसेंबर रोजी दोघेही एकमेकांसोबत विवाहबंधनात अडकले. नुकतेच त्यांच्या या दिमाखदार लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल साईट्सवर पाहाला मिळत आहेत. 

हे ही वाचा: स्क्रीन राईटर जीशान कादरी विरुद्ध एफआयआर दाखल, करोडो रुपयांचा घोटाळा  

आदित्य आणि श्वेता यांच्या लग्नसाहोळ्याचे फोटो आदित्यच्या एका फॅनपेजवरुन शेअर करण्यात आले आहेत. नवरदेव आदित्य क्रिम रंगाच्या शेरवानीमध्ये तर नवरी श्वेता सफेद आणि गुलाबी रंगाच्या लेहेंग्यामध्ये सुंदर दिसत आहेत. लग्नातील जो पहिला फोटो सोशल साईटवर पाहायला मिळाला त्यात दोघेही आनंदी दिसत असून या जोडीवर अनेकांनूी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

 

आदित्यचा बारातमधील एक व्हिडिओ देखील समोर आला होता. ज्यामध्ये त्याचे नातेवाईक आणि बाराती हौशेने नाचताना दिसतायेत. एका व्हिडिओमध्ये बारातीसोबतंच आदित्य आणि त्याची आई देखील ठुमके लगावताना दिसत आहेत. यावेळी आदित्य त्याची आई आणि वडिल उदित नारायण यांचा जबरदस्त लूक दिसून येतोय. 

काही दिवसांपूर्वीच आदित्यने श्वेतासोबतचा फोटो शेअर करत म्हटलं होतं की लग्नाच्या तयारीसाठी तो काही दिवस सोशल मिडियापासून ब्रेक घेत आहे. डिसेंबरमध्ये आपली भेट होईल असं त्याने म्हटलं होतं. तेव्हा आता आदित्यचे चाहते तो कधी सोशल मिडियावर त्याच्या या नव्या आयुष्याबद्दल लिहितोय याची वाट पाहत आहेत.    

aditya narayan and shweta agarwal wedding first photo see here   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: aditya narayan and shweta agarwal wedding first photo see here