#JabariyaJodiTrailer : 'दहेज के लालचियों की जबरिया जोडी'

टीम ईसकाळ
Monday, 1 July 2019

सिद्धर्थ-परिणीतीसह अपराजित खुराना, जावेद जाफ्री यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रशांत सिंह हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 'जबरिया जोडी' हा चित्रपट 2 ऑगस्टला रिलीज होईल.

सिद्धार्थ कपूर, परिणीती चोप्रा स्टारर 'जबरिया जोडी'चा ट्रेलर आज सर्वत्र प्रदर्शित झाला. सिद्धार्थचा बिहारी हटके अंदाज आणि परिणीतीची तिखी छोरीवाली भूमिका हे या चित्रपटाचे आकर्षण आहे. या दोघांची टशन या चित्रपटात बघायला मिळेल.

उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात असलेले हुंड्याचे प्रस्थ आणि त्याला विरोध करणारा अभयसिंह आणि त्याच्याच तोडीची बिनधास्त अशी परिणीती यांच्या लव्हस्टोरीवर आधारित हा चित्रपट आहे. हुंडा घेणाऱ्या नवरदेवांना अभयसिंह धडा शिकवत असतो, त्याला राजकारणाची आवडही असते. अशातच तो परिणीतीच्या प्रेमात पडतो, मग पुढे काय होते? हे या चित्रपटात बघावे लागेल. 'दहेज के लालचियों की जबरिया जोडी' असा त्याचा या चित्रपटातील फेमस डायलॉग आहे.

सिद्धर्थ-परिणीतीसह अपराजित खुराना, जावेद जाफ्री यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रशांत सिंह हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 'जबरिया जोडी' हा चित्रपट 2 ऑगस्टला रिलीज होईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trailer released of Hindi Movie Jabariya Jodi