मोखाड्यातील "मधली सुट्टी" ची घंटा वाजवणार साता समुद्रापार

madhli sutti
madhli sutti

मोखाडा - मोखाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी, आदिवासी भागातील विदारक वास्तव दाखवणारा "मधली सुट्टी" हा लघुपट तयार केला आहे. या लघुपटात मोखाड्यातील च अतिदुर्गम बिवलपाडा येथील बालकलाकार विकास वाजे याने प्रमुख भुमिका साकारलेली आहे. तसेच स्थानिक गावकरी, शिक्षक हे कलाकार आहेत. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अमोल सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून त्यांनीच तयार केलेल्या या लघुपटाने महाराष्ट्रात धुम केली आहे. या लघुपटाला अनेक पुरस्कार ही मिळाले आहेत. त्याचे कौतुक ही झाले. आता हा लघुपट साता समुद्रापार नायजेरीया त "मधली सुट्टी" ची घंटा वाजवणार आहे.     

आदिवासी समाजातील दारिद्र्य, व्यसनाधिनता, पोटातील भुक, कुटूंबाप्रती असलेला जिव्हाळा, बालवयातच पडणारे कुटुंबाचे ओझे आणि त्यामुळे अध्ययनावर होणारे परिणाम या सर्व बाबींचा समावेश करून जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अमोल सुर्यवंशी यांनी 12 मिनिटांचा "मधली सुट्टी" हा लघुपट तयार केला आहे. या लघुपटात मोखाड्यातील अतिदुर्गम, जेथे जाण्यासाठी रस्ता ही नाही अशा बिवलपाडा येथील 4  थीत शिकणार्‍या विकास वाजे या बालकलाकाराने प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच स्थानिक गावकरी, शिक्षक यांचाही कलाकार म्हणून समावेश आहे. मोखाड्यातील आसे जिल्हा परिषद शाळेत या लघुपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. सर्व कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, संवाद हे स्थानिकांनी च तयार केले आहे. 

सिने सृष्टीतील, अथवा कला क्षेत्रातील कोणतीही पार्श्वभुमी पाठीशी नसलेल्या, आदिवासी शेतकरी कुटुंबातील विकास वाजे या बालकराकालातील ऊपजत गुण हेरून अमोल सुर्यवंशी या शिक्षकाने त्याची मुख्य भूमिकेसाठी निवड केली आहे. विकास ने कधी मोबाईल अथवा चित्रपट ही पाहीलेला नाही. तरी ही ऊत्कृष्ट अभिनय करून, विकास ने बघणार्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहे. 

औरंगाबाद येथे नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल मध्ये सर्वोकृष्ठ बालकलाकार म्हणून विकास वाजे ला पुरस्कार मिळाला आहे. तर या लघुपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण नामांकन, 3rd इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल पुणे येथे मिळाले आहे. तसेच अनेक शार्प फिल्म फेस्टिव्हल मध्ये नामांकन मिळाले आहे. 

"मधली सुट्टी" या लघुपटाने समाज माध्यमाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रियता मिळवली आहे. या लघुपटाच्या कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांचे पालघर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कौतुक होऊन त्यांच्यावर रोख बक्षीसासह त्यांना सन्मानित ही करण्यात आले आहे. 

आता या लघुपटाने सातासमुद्रापार भरारी घेतली आहे. नायजेरीयातील शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये "मधली सुट्टी"ला अधिकृत नामांकन मिळाले आहे. त्यामुळे आता मोखाड्यातील "मधली सुट्टी" ची घंटा साता समुद्रापार वाजणार आहे. 

मी आदिवासी समाजातील आहे. या समाजातील दारिद्र्य मी अनुभवले आहे. मोखाड्यातील रोज घडणार्‍या घडामोडी, ज्ञानार्जनाचे काम करताना अनुभवल्या, त्यामुळे आपण त्या लघुपटाद्वारे मांडाव्यात ही संकल्पना डोळ्यासमोर आली. त्याला भावनिक मात्र वास्तव स्थिती चा स्पर्श देऊन "मधली सुट्टी" हा लघुपट तयार केला आहे. यामध्ये विकास वाजे या बालकराकालातील ऊपजत गुण हेरून त्याला मुख्य भूमिका दिली आहे. स्थानिक गावकरी, माझे सहकारी शिक्षक यांच्या ही भुमिका लघुपटात आहेत. लघुपटासाठी संवाद, छायाचित्रण माझ्या सहकारी शिक्षकांनी केले आहे. पुढे आदिवासी समाजातील "अंधश्रद्धा आणि कुपोषण" या विषयावर लघुपट निर्माण करण्याची संकल्पना आखली आहे. 
*अमोल सुर्यवंशी, ( शिक्षक) कथा, पटकथा, दिग्दर्शक, निर्माता

मधली सुट्टी
कलाकार - विकास वाजे , प्रवीण घुले, लक्ष्मण ढोरकुले व गावकरी.
 कथा, पटकथा, दिग्दर्शक - अमोल सुर्यवंशी. 
संवाद - नवीनकुमार कलदुर्के.
 छायाचित्रण - सागर महाजन, विजय शितोळे. 
निर्माता - अमोल सुर्यवंशी, नवीनकुमार कलदुर्के. 

मधली सुट्टीचे यश 
- सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार, औरंगाबाद नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल 2018
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण नामांकन, 3rd - इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल पुणे 2018
- IN-SHORT फिल्म फेस्टिव्हलम 2018 नायजेरीया येथे ऑफिशीअल सिलेक्शन.
- रंगकर्मी इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल 2018 मुंबई येथे ऑफिशिअल सिलेक्शन 
- ऐक्य नॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल 2018 पुणे येथे ऑफिशिअल सिलेक्शन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com