'अरे हा तर मोहम्मद रफी!' ट्रक ड्रायव्हरच्या गाण्यानं नेटकऱ्यांना लावलं वेड!|Truck Driver sing Bollywood Legendary Singer Mohammad Rafi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Truck Driver News

'अरे हा तर मोहम्मद रफी!' ट्रक ड्रायव्हरच्या गाण्यानं नेटकऱ्यांना लावलं वेड!

Social media news: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओंना नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी राणु (Ranu mandal Song) मंडल नावाच्या एका महिलेला मिळालेली प्रसिद्धी अजुन नेटकऱ्यांच्या लक्षात आहे. तिला तर वेगवेगळ्या रियॅलिटी शोमध्ये गेस्ट म्हणून बोलावण्यात आले होते. त्यानंतर तिच्या वाट्याला मोठी प्रसिद्धी आली. त्यातून (Viral News) तिला पैसेही मिळाले. सोशल मीडियाचा असाही प्रभावी वापर होतो हे यानिमित्तानं नेटकऱ्यांच्या लक्षात आले होते. त्यानंतर साधारण दोन महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालमधील एका शेंगा विक्रेत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात तो (Video Viral) कच्चा बादाम म्हणून शेंगा विकत असताना गाणं गाणारा व्हिडिओ (Kachcha Badam News) नेटकऱ्यांना प्रचंड भावला होता.

आता सोशल मीडियावर ट्रक ड्रायव्हरचा व्हिडिओ व्हाय़रल झाला असून त्याला नेटकऱ्यांची दाद मिळाली आहे. त्या वाहनचालकाचे गाणे नेटकऱ्यांना व्हायरल (Bollywod Singer) झाले आहे. काहींनी त्याला मोहम्मद रफीची उपमाही दिली आहे. विवेक वर्मा नावाच्या एका व्यक्तीनं त्याच्या सोशल मीडियावर अकाउंटवरुन एक व्हिडिओ शेयर केला असून त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊसही पडला आहे. तो व्हिडिओ शेयर करताना त्यांनी लिहिलं आहे की, कमलेश काका भलेही वाहनचालक असोत मात्र त्यांच्या अंगी असलेली गायनाची कला ही थक्क करणारी आहे. त्यामुळे ते गाणं लोकप्रिय झालं आहे. त्यांचे गाणे ऐकून त्यांना गायनाची आवड असून त्यासाठी त्यांची मेहनत घेण्याची तयारी आहे असे वाटते. त्यामुळे त्यांना जाणकार रसिकांनी चांगलीच दादही दिली आहे. त्या व्हिडिओला आतापर्यत मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. ज्या व्यक्तीनं आयुष्यभर ट्रक चालवून आपलं जीवन व्यतीत केलं त्यानं जोपासलेली गायनकला ही प्रेरणादायी असल्याचे वर्मा यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: Photo viral - तारक मेहतामधील बाबुलालच्या मुलीचं लग्न, चर्चा तर होणारच!

त्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ड्रायव्हर कमलेश हे मोहम्मद रफी यांचे प्रसिद्ध ' मुझे इश्क है तुझी से' हे गाणं गाताना दिसत आहे. त्यांचं ते गाणं ऐकून नेटकऱ्यांनी त्यांना धन्यवाद देत त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावही केला आहे. त्यांना ते गाणं कमालीचं आवडलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वेगवेगळ्या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून दाद मिळताना दिसत आहे. त्यांनी भरभरून त्या कलाकारांचं कौतुकही केलं आहे. त्यात प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास कच्चा बादाम फेम भुवन बादरायणचे नाव घ्यावे लागेल.

हेही वाचा: Video viral: सुजल जगदाळे उर्फ बुलट कुठं बसलंय बघा! पेपर सोडून आला बैलगाडा शर्यतीत

Web Title: Truck Driver Sing Bollywood Legendary Singer Mohammad Rafi Song Video Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top