esakal | Big Boss Marathi 3 : शिवलीला फेटा घालते; इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य चुकीचे!
sakal

बोलून बातमी शोधा

शिवलीला फेटा घालते; इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य चुकीचे!

शिवलीला फेटा घालते; इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य चुकीचे!

sakal_logo
By
शरयू काकडे

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या(big boss marathi 3) पर्वाची धमाकेदार सुरवात झाले खरे पण पहिल्याच आठवड्यात बिगबॉसच्या घरात तणावाचे वातावरण दिसत आहे. यंदाच्या पर्वात अभिनेत्री-अभिनेत्यांसब राजकारणी, किर्तनकार यांनी प्रवेश घेतला आहे. दरम्यान, सामजिक कार्यकर्त्यां तृप्ती देसाई आणि किर्तनकार शिवलीला पाटील यांच्यामध्ये इंदुरीकर महाराजांच्या किर्तनावरून शाब्दिक वादावादी झाली.

हेही वाचा: खऱ्या आयुष्यातील किर्तनकार शिवलीला, पाहा न पाहिलेले PHOTO

झाले असे की, बिगबॉसच्या घरात तृप्ती देसाई, किर्तनकार शिवलीला पाटील , मीनल शाह, सुरेखा कुडाची यांच्या गप्पा रंगल्या होत्या. दरम्यान इंदुरीकर महाराज यांचा विषय सुरू झाला. यावेळी शिवलीला यांनी, तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजाच्यांविरोधात केस केली होती असे सांगितले. मी किर्तन करताना संदर्भ देऊनच बोलते असेही शिवलीला यांनी सांगितले.

त्यावर प्रत्यूत्तर देताना तृप्ती देसाई म्हणाल्या, इंदुरीकर महाराजांची किर्तनामध्ये महिलांचा अपमान करणारी असतात. आमच्या आंदोलनानंतर युट्यूबवरून जवळपास 80 टक्के किर्तनाचे व्हिडिओ डिलीट केली'' कारण तेव्हा आम्ही मोहीमच सुरु केली होती, त्यावेळी संपूर्ण जिल्हा माझ्या विरोधात होता.

हेही वाचा: शिवलीला ताई, तुम्ही बिग बॉसमध्ये जायला नको होतं; समर्थक नाराज

''महिलांनी फेटा घालू नये'' असे इंदुरीकर महाराज म्हणाले होते. ''महिलांनी फेटा घातला तर आम्ही काय गाऊन घालायचं का?” त्यांनी केलेलं हे विधान चुकीचे होते. शिवलीला देखील किर्तनाचे अनेक कार्यक्रम करताना फेटा घालतात, अनेक ठिकाणी फेटा घातला जातो त्यात गैर काय असं देखील तृप्ती देसाई म्हणाल्या.

त्यावर शिवलीला यांनी उत्तर दिले की ''मी किर्तन करताना फेटा घालते. इतर वेळी मी फेटा घालत नाही.

loading image
go to top