esakal | "तेव्हा पतीने माझी आरती ओवाळली"; तृप्ती देसाईने सांगितला किस्सा
sakal

बोलून बातमी शोधा

On November 17 Trupti Desai will go to Shabarimala

"तेव्हा पतीने माझी आरती ओवाळली"; तृप्ती देसाईने सांगितला किस्सा

sakal_logo
By
स्वाती वेमूल

महिलांचा मंदिर प्रवेश आणि महिला अत्याचाराविरोधात सतत लढणाऱ्या भूमाता महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई Trupti Desai या बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या Bigg Boss Marathi 3 पर्वात सहभागी झाल्या आहेत. बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांशी त्यांची चांगली गट्टी जमली असून त्यांनी वैयक्तिक अनुभव त्यांच्यासोबत शेअर केले आहेत. पतीने एकदा आपली आरती ओवाळल्याचंही तृप्ती देसाईंनी सांगितलं. मंदिरातील प्रवेशाबाबत लढण्यासाठी तुम्हाला कोणाकडून प्रेरणा मिळाली, असा प्रश्न सोनाली पाटीलने तृप्ती देसाईंना विचारला. त्यावर उत्तर देताना त्यांनी एक प्रसंग सांगितला.

तृप्ती देसाईंनी सांगितला प्रसंग-

"मी आस्तिक आहे, देवावर माझी श्रद्धा आहे. एकदा मी पतीसोबत जेवायला बसले असताना टीव्हीवर एक बातमी दाखवण्यात येत होती. कॉलेजमधील एक विद्यार्थिनी एका मंदिराच्या चौथऱ्यावर जाऊन देवाचं दर्शन घेतल्याची ती बातमी होती. त्या मंदिराच्या चौथऱ्यावर कुणालाच प्रवेश नव्हता. नंतर संबंधित विद्यार्थिनीला खाली आल्यानंतर गोमूत्र आणि दुधाने अभिषेक घालून पवित्र केल्याचं सांगितलं गेलं. आईच्या उदरातूनच देवाचा जन्म झाला, मग देवदर्शनापासून का रोखलं गेलं, असा प्रश्न मी पतीला विचारला. तेव्हा त्यांनी मला प्रेरणा दिली. केरळला जाताना त्यांनी माझी आरती ओवाळली होती. तू यशस्वी होऊनच ये, असं ते म्हणाले होते", असं तृप्ती देसाईंनी सांगितलं.

हेही वाचा: KBC 13: पत्नीने बिग बींना सांगितली व्यथा; वाहिनीविरोधात पतीने बजावली नोटीस

बिग बॉस मराठीत का घेतला भाग?

सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी तृप्ती देसाईंना शोमध्ये सहभागी होण्यामागचं कारण विचारलं. या प्रश्नाचं उत्तर देताना त्या म्हणाल्या, "समाजात माझी जी प्रतिमा निर्माण झाली, त्या प्रतिमेच्या पलीकडे जाऊन मी व्यक्ती म्हणून कशी आहे, हे लोकांना समजावं यासाठी मी बिग बॉसमध्ये येण्याचा निर्णय घेतला आहे."

loading image
go to top