esakal | विजय सेतुपतीचा बहुचर्चित'तुघलक दरबार' रिलीज

बोलून बातमी शोधा

Tughlaq Durbar Release Vijay Sethupathi
विजय सेतुपतीचा बहुचर्चित'तुघलक दरबार' रिलीज
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - दाक्षिणात्य अभिनेता म्हणून विजय सेतूपतीची वेगळी ओळख आहे. केवळ टॉलीवूडमध्येच तो प्रसिध्द आहे असे नाही तर बॉलीवूडमध्येही त्यानं आपल्या अभिनयानं मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोअर्स तयार केले आहेत. विजयचा मोठा चाहतवर्ग बॉलीवूडमध्ये आहे. प्रसिध्द अभिनेता आमिर खानच्या एका लाल सिंग चढ्ढा चित्रपटात तो दिसणार होता. अशी चर्चा होती. मात्र त्याबाबत त्यानं ती भूमिका करण्यास नकार दिल्याचे सांगितले होते. आता त्याचा नवा चित्रपट तुघलक दरबार प्रदर्शित झाला आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

विजय सेतूपतीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे त्याचा बहुचर्चित चित्रपट त्यांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. त्या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांना हा चित्रपट ऑनलाईन पाहता येणार असल्याचे सांगितले आहे. डिस्ने हॉटस्टारवर हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. कोरोनामुळे सध्या मनोरंजन विश्वात चिंताजनक परिस्थिती आहे. आतापर्यत वेगवेगळ्या सेलिब्रेटींना कोरोना झाला आहे. याचा परिणाम अनेक चित्रपट आणि वेबमालिकांच्या प्रदर्शनावर झाला आहे कोरोनानं निर्माते, दिग्दर्शक यांच्या समोरील अडचणीत वाढ केली आहे.

विजयचा तुघलक दरबार नावाचा चित्रपट हा मे महिन्यात प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनामुळे त्याच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली. सध्या कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतो आहे अशावेळी त्याला सामोरं जाताना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. कोरोना वाढू नये यासाठी प्रशासनानं वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध नागरिकांवर घातले आहेत. याशिवाय अनेक क्षेत्रांना कोविडचे नियम बंधनकारक केले आहेत.

img

Tughlaq Durbar Release Vijay Sethupathi

कोरोनाचा मोठा फटका अनेक तमिळ निर्मात्यांना बसला आहे. त्यांचे कित्येक चित्रपट कोरोनाच्या कात्रीत सापडले आहेत. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर ते चित्रपट किंवा मालिका प्रदर्शित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यापूर्वी तुघलकचा टीझर 11 जानेवारीला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये विजयनं एका राजकीय नेत्याची भूमिका साकारली आहे. विजय शिवाय प्रतिभन, मंजिमा मोहन, राशी खन्ना आणि सम्युक्त यांच्याही भूमिका चित्रपटात आहेत.