esakal | 'फुटबॉल झाली आहेस'; म्हणून हिणवणाऱ्याला धनश्री कडगावकरचं सडेतोड उत्तर

बोलून बातमी शोधा

dhanashri kadgaonkar
'फुटबॉल झाली आहेस'; म्हणून हिणवणाऱ्याला धनश्री कडगावकरचं सडेतोड उत्तर
sakal_logo
By
स्वाती वेमूल

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत वहिनीसाहेबांची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री कडगावकर सध्या खऱ्या आयुष्यात आईच्या भूमिकेत आहे. धनश्रीने मुलाला जन्म दिला असून सोशल मीडियावर ती चिमुकल्यासोबतचे अनेक फोटो पोस्ट करत असते. अशाच काही फोटोंवर धनश्रीच्या स्थूलपणावरून नकारात्मक कमेंट्स आल्या. ट्रोल करणाऱ्यांना धनश्रीने स्क्रीनशॉट शेअर करत सडेतोड उत्तर दिलं आहे. त्याचप्रमाणे चाहत्यांनाही संबंधित नेटकऱ्यांना उत्तर देण्यास सांगितलं आहे. धनश्रीच्या या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांनीही ट्रोलर्सना खडेबोल सुनावले आहेत.

'तुम्ही अशा पद्धतीने महिलांसोबत वागता का? इन्स्टाग्राम अकाऊंटवर तुमचं खरं नाव ठेवण्याची हिंमतसुद्धा नाही. या व्यक्तीविरोधात कारवाई करा', अशी पोस्ट धनश्रीने लिहिली. त्याचसोबत त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा शेअर केला. धनश्रीच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्या अकाऊंटविरोधात तक्रार केली. चाहत्यांचे आभार मानत तिने पुन्हा एक पोस्ट लिहिली. 'मला ट्रोल करणाऱ्या अकाऊंटविरोधात तक्रार करणाऱ्यांचे खूप खूप आभार. मी फुटबॉल झाली आहे आणि अशा नकारात्मक कमेंट्स करणाऱ्यांनाही माझ्या अनेक चाहत्यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. तुमचे खूप आभार', अशा शब्दांत ती व्यक्त झाली.

img

हेही वाचा : 'लागीरं झालं जी' मालिकेतील 'शीतली'ला कोरोना

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत गायकवाड घराण्याची धाकटी सून नंदिता वहिनीची भूमिका साकारणारी धनश्री अल्पावधीतच प्रसिद्ध झाली. राणा व अंजलीच्या प्रेमात नेहमी अडथळा आणणाऱ्या नंदिता वहिनी म्हणून तिची घराघरात ओळख झाली.