तुला पाहते रे' घेणार निरोप; 'ही' नवी मालिका येणार प्रेक्षकांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 6 July 2019

अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली 'तुला पाहते रे' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ईशा निमकर आणि विक्रम संरजामे यांच्या प्रेमकथेने सुरु झालेली ही मालिका ट्विस्टमुळे वेगळ्याच वळणावर पोहचली. सध्या मालिकेची शेवटाकडे वाटचाल सुरु असून अखेर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

अल्पावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली 'तुला पाहते रे' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ईशा निमकर आणि विक्रम संरजामे यांच्या प्रेमकथेने सुरु झालेली ही मालिका ट्विस्टमुळे वेगळ्याच वळणावर पोहचली. सध्या मालिकेची शेवटाकडे वाटचाल सुरु असून अखेर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याजागी प्रेक्षकांच्या भेटीला नवी मालिका जाहिर होईल.

विक्रांत विवाहित असल्याचे ईशाच्या समोर येते. तरीही विक्रांतच्या प्रेमात असलेली ईशा त्याच्याशी लग्न करते. लग्नानंतर विक्रांत संराजामे याचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर येतो. ईशा हिच विक्रांतची पहिली बायको असून तिचा पुर्नजन्म झाल्याचे समोर येते. विक्रांतनेच राजनंदिला मारल्याचे सत्य ईशाच्या समोर येते. अशा बऱ्याच घडामोडी मालिकेत पाहायला मिळाल्या.

मालिकेत ईशा प्रेग्नंट असून विक्रांतला त्याच्या चुकीची जाणीव झाली आहे. विक्रांत ईशाच्या खरोखर प्रेमात पडला आहे. त्यामुळे या कथेचा शेवट गोड होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात विक्रांत गायब असून ईशा त्याला शोधताना दिसते. त्यामुळे विक्रांत-ईशाच्या कथेचा शेवट काय होईल याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रंचड उत्सुकता निर्माण झाली आहे.

मालिका जास्त भागांची नसल्यामुळे कथानक तसेच रेखाटले होते. 20 जुलैला 'तुला  पाहते रे' मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. या मालिकेच्या जागी 22 जुलैपासून 'अग्गबाई सासुबाई' हि मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

लग्न सासूचं....करवली सुनबाई... अग्गबाई सासुबाई'
'अग्गबाई सासुबाई' या नव्या मालिकेबाबतही प्रेक्षकांना प्रंचड उत्सुकता आहे. 'होणार सुन मी या घरची' फेम तेजश्री प्रधान सुनेच्या भुमिकेत तर सासुच्या भुमिकेत निवेदिता सराफ दिसणार आहे. नुकताच मालिकेचा टिझर लाँच झाला. त्यावरुन सासूच्या लग्नात सुनबाई करवली म्हणून मिरवणार असल्याचे दिसते.

नुकतीच 'तुला  पाहते रे' मालिकेची रॅप-अप पार्टी झाली. या पार्टीचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात सुबोध भावे यांनी पिंटो डूडलच्या भैरवी यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्राच्या फ्रेम भेट सर्व कलाकरांना म्हणून दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tula Pahate Re serial will end And New serial will start soon