'कोण मामा, कुठला मामा तो तर....' शिझानच्या बहिणीचा मोठा गौप्यस्फोट | Tunisha Death Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tunisha Death Case

Tunisha Death Case : 'कोण मामा, कुठला मामा तो तर....' शिझानच्या बहिणीचा मोठा गौप्यस्फोट

Tunisha Death Case Shizaan Khan Sister Phalak Naaz press conference: तुनिषा शर्मानं आत्महत्या केली आणि टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आले. तिच्या मृत्युनंतर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. काही दिवसांपूर्वी तुनिशाच्या आईनं तुनिशाचा बॉयफ्रेंड शिझान खानवर गंभीर आरोप केले होते.

शिझानच्या वकिलांनी दोन दिवसांपूर्वी आपण जर प्रेस कॉन्फरन्स घेतली तर ते तुनिषाच्या आईला खूप महागात पडल्याशिवाय राहणार नाही. त्यांची मुलगी गेली आहे. याचे वाईट वाटते. आम्हाला त्याचा खेदही आहे. मात्र त्याच्या धक्क्यामध्ये त्या जे काही आरोप करत आहे त्याला कोणताही पुरावा नाही. आधार नाही. हे त्यांनी लक्षात घेण्याची आहे. यावर आता शिझानच्या बहिणीनं पुन्हा काही आरोप केले आहेत.

Also Read - ५० वर्षांनंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या होणार तरुणांच्या दुप्पट

तुनिषाचा मामा म्हणून जो व्यक्ती तावातावानं बोलत होता तो काही तिचा मामा नाहीच. त्याच्याबाबत आम्हाला वेगळीच माहिती मिळाल्याचे शिझानच्या बहिणीनं सांगितलं आहे. तो तुनिषाचा मॅनेजर होता. तो काही तिचा मामा नाही हे लोकांनी लक्षात घ्यावे. त्याच्यावरुन सोशल मीडियावरुन काय बोलले जात आहे हे काही नव्यानं सांगण्याची गरज नाही.

हेही वाचा: Ved Movie Collection : रितेश भाऊच्या 'वेड'चा धुमाकूळ 3 दिवसांत 'एवढी' कमाई...! ठरला टॉप ओपिनिंग मुव्ही

तुनिषाच्या आईनं आपल्या मुलीच्या आत्महत्येला शिझानच जबाबदार असल्याचे म्हटले होते. त्यानं मुलीला मानसिक त्रास दिला याशिवाय तिला धर्मपरिवर्तन करण्यासाठी बळजबरी केल्याचे शिझानच्या आईनं सांगितले. त्यावर शिझानच्या बहिणीनं या साऱ्या आरोपांचे खंडन केले आहे. तिनं आता तुनिषाबाबत एक धक्कादायक विधान करुन नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा: Prarthana Behare : 'तू आमच्या मनातून उतरली!' प्रार्थनाचा 'तो' व्हिडिओ चाहत्यांची नाराजी

शिझानची बहिण फलक नाज म्हणाली, तुनिषाला काही मनोरंजन विश्वामध्ये काम करायचे नव्हते. तिची तशी इच्छाही नव्हती. मात्र यासगळ्याला तिच्या आईचा मोठा पाठींबा होता. तिचा आग्रह होता असे फलकनं म्हटले आहे.