शिझानचा 14 दिवस तुरुंगात मुक्काम! तुनिशा शर्मा केसला नवं वळण| Tunisha Sharma Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tunisha Sharma Case

Tunisha Sharma Case : शिझानचा 14 दिवस तुरुंगात मुक्काम! तुनिशा शर्मा केसला नवं वळण

Tunisha Sharma Death Case Sheezan Khan 14 days : तुनिशा शर्मा प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी तुनिशाच्या आईनं पत्रकार परिषदेतून काही धक्कादायक गोष्टी सांगितल्या होत्या. आता या प्रकरणात राजकीय आणि धार्मिक रंग चढत असल्याचे दिसून येत आहे.

तुनिषाच्या आत्महत्येला तिचा मित्र शिझान हाच जबाबदार असल्याचा आरोप तिच्या आईनं केला आहे. त्यामुळे मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी शिझानला अटक केली असून त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आले तेव्हा कोर्टानं त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तुनिषा प्रकरणाचा संबंध हा आता श्रद्धा वालकर - आफताब पुनावालाशी जोडला जातो आहे.

Also Read - जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

तुनिषानं आत्महत्या केल्यानंतर शिझानची डोकेदुखी आता वाढत चालली आहे. गेल्या काही दिवसांत त्याच्यावर झालेले आरोप हे भयानक आहे. त्याचे आणि तुनिषाचे वाद होते. तो तिला धर्म परिवर्तनासाठी आग्रह करत होता. दुसरीकडे तुनिषाला काही झालं तरी शिझानशी लग्न करायचं होतं. त्यामुळे ती भांडणामुळे नैराश्यात असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Ved Review : रितेश-जेनेलियाचा प्रेमात पाडणारा 'वेड'! अभिनय, गाणी सगळंच 'लई भारी'

सीसीटीव्ही फु़टेजमधून देखील काही वेगळ्या गोष्टी समोर आल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय शिझान हा तुनिषाला मारहाण करत असल्याच्याही गोष्टी सोशल मीडियातून व्हायरल झाल्या आहेत. भलेही शिझानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली असली तरी त्याचे कुटूंबिय हे त्याच्या जामीनासाठी अर्ज करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.