'मुसलमान असणं गुन्हा आहे का?' शिझानच्या आईचा सवाल! बहिण फलक रुग्णालयात...| Falaq Naaz Hospitalized | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Falaq Naaz Hospitalized

Falaq Naaz Hospitalized : 'मुसलमान असणं गुन्हा आहे का?' शिझानच्या आईचा सवाल! बहिण फलक रुग्णालयात...

Falaq Naaz Hospitalized : टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर दिवसागणिक वेगवेगळे धक्कादायक खुलासे समोर येत आहे. त्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी तुनिषाचा बॉयफ्रेंड शिझान खानला अटक केली आहे. यासगळ्यात शिझानच्या आईनं काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

प्रसिद्ध कलाकार शिझान खानच्या बहिणीला फलक नाझला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर शिझानच्या आईनं इंस्टावरुन एक पोस्ट शेयर केली असून त्याची चर्चा आहे. त्यावरुन पुन्हा एकदा वेगळ्या वादाला तोंड फुटल्याचे दिसून आले आहे. त्यांनी भावूक होत आपली व्यथा यावेळी सोशल मीडियावर मांडल्यानं नेटकऱ्यांनी त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली आहे. संयम....अशा एका शब्दांत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Also Read - प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

Falaq Naaz Hospitalized

Falaq Naaz Hospitalized

फलकचा रुग्णालयात दाखल केलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट करुन शिझानच्या आईनं संयम असे म्हटले आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांचे सांत्वन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, मला एक गोष्ट समजत नाही ती म्हणजे आमच्या कुटूंबियांना कोणत्या गोष्टीची शिक्षा मिळत आहे. माझा मुलगा हा एक महिन्यांपासून जेलमध्ये आहे. तो विनाकारण शिक्षा भोगत आहे.

माझी मुलगी फलक देखील रुग्णालयात दाखल झाली आहे. शिझानचा जो लहान भाऊ आहे तो ऑटिस्टिक आजारानं ग्रस्त आहे. त्यामुळे मला या सगळ्या परिस्थितीत काय करावे असा प्रश्न आहे. मला सांगा फलक जर तुनिषाप्रती सहानुभूती व्यक्त करते आहे, त्यांचे संबंध देखील फार सलोख्याचे होते, हे सगळं असताना देखील आम्हाला नावं ठेवली जातात. याचे कारण काय आहे, आम्ही मुस्लिम आहोत हा आमचा गुन्हा आहे का, शिझानच्या बहिणीनं शफाक नाझनं देखील ती पोस्ट शेयर केली आहे.

हेही वाचा: Pathaan Movie: 'पठाण' रिलीज होण्यापूर्वी शाहरुखची हवा! मन्नत बाहेर चाहत्यांची जत्रा

जानेवारीच्या महिन्याच्या सुरुवातीला पालघर कोर्टानं शिझान खानची जामिनाची याचिका फेटाळुन लावली होती. २५ डिसेंबरला अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्या प्रकरणात शिझान खानला अटक करण्यात आली होती. तुनिषानं अली बाबा - दास्तान ए काबुल मध्ये शिझानसोबत अभिनय केला होता. २४ डिसेंबर रोजी तुनिषानं तिच्या शो च्या सेटवर आत्महत्या केली होती.

हेही वाचा: Jaya Jaya Jaya Jaya Hey Review : बायको जयासारखी असेल तर मग 'दवाखाना' जवळ हवाच!