Tunisha Sharma: मी तिच्या आईला बजावलं होत...शीजानने केला खुलासा.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tunisha sharma and shizaan khan

Tunisha Sharma: मी तिच्या आईला आधीच बजावलं होत...शिजानने केला खुलासा...

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हीनं सिरियलच्या शुटिंग दरम्यान सेटवरच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. या प्रकरणात अनेक नवीन खुलासे झाले आहेत तिच्या आईच्या वरुन शीजान खानला अटक केली आहे. आता तो ४ दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. त्याची चौकशी सुरु आहे. आता त्यांन या चौकशीत अनेक खुलासे केले आहेत.

शीजान तुनिशाबाबत अनेक गोष्टी पोलिसांना सांगत आहे. एका वृत्त संस्थेला पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शीजनने आता पोलिसांना सांगितलयं की, तुनिषाने आत्महत्या करण्यापूर्वी काही दिवसांपूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी शीजननेच तिला वाचवलं होतं. शीजानने सांगितले की, त्याने तुनिषाच्या आईलाही याबाबत माहीती दिली होती आणि तिची काळजी घेण्याचंही सांगितलं होतं.

हेही वाचा: Tunisha Sharma: 'कुछ तो गडबड है...'AICWA अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

त्याचवेळी शीजनने पोलिसांना सांगितलं आहे की, तुनिषाने आत्महत्येच्या आदल्या दिवशी तिने खाणं पिणं बंद केलं होतं. घटनेच्या दिवशी शीजनने तिला खाऊ घालण्याचा प्रयत्नही केला होता पण त्या दिवशीही तिने काही खाण्यास नकार दिला.

हेही वाचा: Tunisha Sharma Suicide: तुनिषाचं नव्हे तर यशाच्या शिखरावर असताना 'या' अभिनेत्रीनींही संपवलं आयुष्य..

पुढे शीजानने म्हणाला की, यानंतर मी तुनिशाला सेटवर फिरायला येण्यासाठी सांगितलं होतं, पण तिने नंतर येईन असं सांगितलं. त्यानंतर मी माझ्या कामात व्यस्त झालो. बराच वेळ होऊनही जेव्हा तुनिषा सेटवर आली नाही तेव्हा त्याने स्वतः मेकअप रूममध्ये जाऊन दरवाजा ठोठावला. मात्र यातून काहीच आवाज न आल्यानं त्याने इतरांच्या मदतीने दरवाजा तोडला. त्यावेळी तुनिशा आत लटकलेली होती. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

हेही वाचा- Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?