Tunisha Sharma : सलमान खानसोबत ‘दबंग 3’ अन् मिलिअन्स फॉलोअर्स

तुनिषाच्या आत्महत्येच्या बातमीने तिच्या लाखो चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
Tunisha Sharma
Tunisha SharmaSakal

Tunisha Sharma Suicide : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Tunisha Sharma
Tunisha Sharma : 'जो जुनून के दम पर आगे बढ़ते हैं...' आत्महत्येच्या काही तास आधी केली होती पोस्ट

तुनिषाने 'अली बाबा दास्तान-ए-काबुल' या टीव्ही सीरियलमध्ये राजकुमारी मरियमची भूमिका साकारत होती. शनिवारी याच शोच्या शुटिंगदरम्यान मेकअप रूममध्ये तिने गळफास घेत आत्महत्या केली. यानंतर तिला तात्काळ रूग्णालयात नेण्यात आले मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

तुनिशा अवघी 20 वर्षांची होती. 'भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप' या टीव्ही मालिकेतून तिने करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिने 'चक्रवर्ती अशोक सम्राट', 'गब्बर पुंचवाला', 'शेर-ए-पंजाब : महाराजा रणजीत सिंह', 'इंटरनेट वाला लव', 'इश्क सुभानल्लाह' या चित्रपटांमध्येही काम केले होते.

Tunisha Sharma
Tunisha Sharma : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची सेटवरच आत्महत्या

तुनिषाने अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. यामध्ये प्रामुख्याने 'फितूर', 'बार बार देखो', 'कहानी 2' आणि 'दबंग 3' आदी चित्रपटांचा समावेश आहे. 'कहानी 2' मध्ये तुनिषा विद्या बालनची मुलगी झाली होती. याशिवाय तुनिषा 'दबंग 3' मध्ये एका छोट्या भूमिकेतही दिसून आली होती.

सोशल मीडियावर 1 मिलियन फॉलोअर्स

तुनिषाचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोअर होते. तिच्या इन्स्टाग्रामवर 1 लाखांहून अधिक फॅन्स तिला फॉलो करतात. तुनिषा नेहमी तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असे. मृत्यूच्या काही तास आधीदेखील तिने एक पोस्ट शेअर केली होती.

ही पोस्ट ठरली अखेरची

मृत्युच्या काही तास आधी तनुषाने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती एक पोज देताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'जो जुनून के दम पर आगे बढ़ते हैं, वो रुकते नहीं हैं।'' असे नमुद केले होते. तिची ही शेवटची पोस्ट पाहून तनुषा एक प्रबळ इच्छाशक्ती असलेली व्यक्ती होती हे स्पष्ट होते. मात्र, अचानाक तिच्या मृत्यूच्या बातमीने तिच्या लाखोचाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com