
'माझ्यासारखी टिकाकारही तुमच्यामुळे...',स्वरा भास्करनं उद्धवजींचे मानले आभार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी राजीनामा(resign) दिल्यानंतर सर्व स्तरातून आतापर्यंत वेगवेगळ्या प्रतिक्रियी उमटत आहे. मनोरंजन क्षेत्रातूनही आतापर्यंत अनेक कलाकारांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. नेहमीच वादग्रस्त कमेंटमुळे चर्चेत असलेल्या स्वरा भास्करनेही(Swara Bahskar) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानणारी एक पोस्ट केली आहे. स्वरानं मुख्यमंत्र्यांनी गेल्या अडीच वर्षात केलेल्या कामगिरीचे आभार तर मानले आहेत पण नेमके कशा शब्दात? चला,सविस्तर जाणून घेऊया.(Turned critics into admirers': Swara Bhasker's 'thank you' message for Uddhav Thackeray)
हेही वाचा: स्वरा भास्करला जीवे मारण्याची धमकी, काय लिहिलंय निनावी पत्रात?
शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि महाराष्ट्राचे नेते एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक असलेल्या ३९ आमदरांनी आपल्याच पक्ष नेतृत्वविरोधात बंड पुकारल्यानंतर उद्धव ठाकरें समोर मोठा पेचप्रसंग उभा राहिला होता. अखेर काल रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला. यानंतर भाजपच्या गोटात सेलिब्रेशन होत असलं तरी अनेकांची मन मात्र दुखावली आहेत. दिग्दर्शक केदार शिंदे,शेफ पराग कान्हेरे,आरोह वेलणकर यासारख्या अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
बॉलीवूडमधनं स्वरानेही मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया नोंदवताना तिच्या ट्विटर अकाऊंटवर ट्वीट करीत म्हटलं आहे,''तुमच्या नेतृत्वाबद्दल खूप धन्यवाद. कोरोना काळात आपण निःपक्षपाती पणे राज्याची जबाबदारी चोख पाडलीत. अत्यंत स्पष्टपणे पारदर्शक संवाद साधणारे आणि आश्वासक नेते म्हणूनआम्ही तुमच्याकडे पाहिलं. तुम्ही तुमच्या वागण्यानं माझ्यासारख्या टीकाकारालाही आपलं प्रशंसक बनवलत. तुमच्या नेतृत्वाखाली महराष्ट्र प्रशासनानं जे काम केलं ते खरोखरच प्रशंसनीय आहे''.
हेही वाचा: तुम्हाला अलविदा म्हणताना.. उद्धव ठाकरेंसाठी हेमंत ढोमेची भावूक पोस्ट..
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने २८ नोव्हेंबर, २०१९ रोजी सत्ता स्थापन केली होती. गेल्याच महिन्यात या सरकारानं त्यांचा अडीच वर्षाचा कालावधी पूर्ण केला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी हे सरकार पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला होता. पण घरातील लोकांनीच दगा दिला अशी म्हणण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली,नव्हे ते तसे व्यक्त देखील झाले. आणि अखेर २९ जून २०२२ रोजी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा उद्धव ठाकरे यांनी दिला.
Web Title: Turned Critics Into Admirers Swara Bhaskers Thank You Message For Uddhav
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..