'तुला पाहते रे'मध्ये टर्निंग पॉईंट, राजनंदिनीचं रहस्य उलगडणार!

वृत्तसंस्था
गुरुवार, 16 मे 2019

इतके दिवस 'तुला पाहते रे' मालिकेत विक्रांत सरंजामे आणि इशाच्या प्रेमाचे युद्धात रूपांतर होणार आहे. या मालिकेत आता असा एक टर्निंग पॉईंट येणार आहे, ज्यामुळे खळबळ उडेल आणि एक रहस्य उलगडेल.

इतके दिवस 'तुला पाहते रे' मालिकेत विक्रांत सरंजामे आणि इशाच्या प्रेमाचे युद्धात रूपांतर होणार आहे. या मालिकेत आता असा एक टर्निंग पॉईंट येणार आहे, ज्यामुळे खळबळ उडेल आणि एक रहस्य उलगडेल.

ज्या इशासाठी विक्रांत हे प्रेमळ नवरा आणि तिचा सर्वस्व होता, त्यालाचा आता इशा अद्दल घडवणार आहे. काय असेल हा ट्विस्ट? 

विक्रांतने त्याची पहिली पत्नी राजनंदिनी हिचा संपत्तीसाठी खून केला आहे, हे रहस्य अनेक दिवस इशापासून लपून राहिले होते, पण आता तिला याचा उलगाडा झालाय व संपत्तीच्या नादात विक्रांतने राजनंदिनीचा बळी दिला हे खुद्द इशाच सांगणार आहे.

पण हे रहस्य एवढ्यावरच येऊन थांबत नाही. तर अजून एक मोठा खुलासा आता, 'तुला पाहते रे'मध्ये होणार आहे. खुद्द इशा हीच राजनंदिनी आहे, व आपल्या खूनाचा बदला घेण्यासाठी ती परत आली आहे.

राजनंदिनीचा खून झाल्यामुळे तिची भूमिका साकारणाऱ्या शिल्पा तुळसकर यांचा ट्रॅकही मालिकेतून संपला आहे. 

येत्या शनिवारी (ता. 18) प्रदर्शित होणाऱ्या महाएपिसोडमध्ये या सर्व रहस्यांचा उलगाडा होईल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Turning point in marathi serial Tula Pahate Re