Tushar Kapoor Birthday: लग्न न करताच झाला बाप! सिंगल राहण्यामागचं 'हे'आहे कारण.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tushar Kapoor Birthday he revealed why he not get married

Tushar Kapoor Birthday: लग्न न करताच झाला बाप! सिंगल राहण्यामागचं 'हे'आहे कारण..

tusshar kapoor: अभिनेता तुषार कपूर हे बॉलीवूड मधील महत्वाचं नाव. आज जरी हे नाव फार चर्चेत नसले तरी एकेकाळी तुषार कपूरचा बॉलीवूडमध्ये चांगलाच दबदबा होता. त्याने अनेक चित्रपट हिट केले आहेत. सध्या अभिनयापलीकडे जाऊन तो निर्मिती क्षेत्रात कार्यरत असल्याचे पडद्यामागे त्याचे योगदान अधिक आहे. शिवाय तो एकल पिता असल्याने सगळ्यांचे लक्ष त्याच्या भूमिकांकडे असते. अशा तुषार कपूरचा आज वाढदिवस. आज तो आपला 46 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया त्याने लग्न न करताच बाप होण्याचा निर्णय का घेतला आणि लग्न न करण्यामागे त्याची काय ठोस कारणं आहेत.

(Tushar Kapoor Birthday he revealed why he not get married)

हेही वाचा: महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

तुषार आज 47 व्या वर्षात पदार्पण करत आहे पण आजवर त्याने लग्न केले नाही. किंबहुना 'मला लग्न करायचेच नाही. मी सिंगलच खूप आनंदी आहे.' असे तो ठामपणे म्हणतो. त्याला लग्नाविषयी सतत विचारले जायचे तेव्हा एक दिवस त्याने स्पष्ट पणे उत्तर देत यावर पडदा टाकला. तो म्हणाला होता की, 'खरं सांगायचं तर मला लग्न करायचं नाही. मी सिंगल आहे (i am single i am happy) याचा मला आनंद आहे. मला माझं आयुष्य आणखी कुणाबरोबर शेअर करायचे नाहीये.'

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: यंदा दोन सदस्य घराबाहेर.. की बिग बॉसची खेळी? तुम्हाला काय वाटतं?

2016 मध्ये तुषार हा लक्ष्य नावाच्या मुलाचा बाप झाला होता. त्यासाठी सेरोगसी तंत्रज्ञानाची मदत घेतली होती. त्याची बहिण एकता कपूर ही देखील सिंगल मदर आहे. ती एकटीच तिच्या मुलाची रविची देखभाल करते आहे. त्यामुळे ही दोघेही बहीण-भाऊ लग्न न करताच आई-बाप झाले आहेत.

एका मुलाखतीमध्ये तुषारनं सांगितलं होतं की, 'मला माझ्या चॉईसवर कुठलाही संशय नाही. मात्र मला ज्यावेळी लग्नावरुन प्रश्न विचारला जातो तेव्हा मला ते आवडत नाही. मला लग्न करायचे नाही हे मी अनेकदा सांगितले आहे. माझा निर्णय ठाम आहे. आता तर मी एका मुलाचा बाप आहे आणि मी त्याचा सांभाळ उत्तम पद्धतीने करत आहे. आणि जे आयुष्य मी जगत आहे त्यात मी प्रचंड आनंदी आहे. विशेष म्हणजे मला माझं भविष्य आणखी कुणाबरोबर शेअर करायचं नाहीये.'

टॅग्स :tusshar kapoor