Bigg Boss Marathi 4: यंदा दोन सदस्य घराबाहेर.. की बिग बॉसची खेळी? तुम्हाला काय वाटतं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

yashashri masurkar eliminated from Bigg Boss Marathi 4

Bigg Boss Marathi 4: यंदा दोन सदस्य घराबाहेर.. की बिग बॉसची खेळी? तुम्हाला काय वाटतं?

bigg boss marathi 4: 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi)च्या चौथ्या पर्वातून सहावा सदस्य घराबाहेर पडला. काल घरातून यशश्री मसुरकरची एक्झिट झाली. गेली काही दिवस यशश्री प्रचंड अस्वस्थ होती. तिचे आणि अमृताचे नातेही फिस्कटले होते. त्यामुळे सततचे वाद आणि टास्क मध्येही दुर्लक्ष झाल्याने तीचा खेळ डाउन झाला होता, अखेर ती काल शनिवारी चावडीच्या दिवशी घराबाहेर पडली.

(yashashri masurkar eliminated from Bigg Boss Marathi 4 )

हेही वाचा: Manasi Naik: नवऱ्यासोबतचे फोटो डिलिट.. चाहते म्हणाले घटस्फोट झाला की काय?

यंदाच्या आठवड्यात एक नाही तर दोन सदस्य घराबाहेर पडणार असे जाहीर करण्यात आले होते. यशश्रीबरोबर किरण माने, अमृता देशमुख, अमृता धोंगडे आणि तेजस्विनी लोणारी हे स्पर्धक डेंजर झोनमध्ये होते. त्यातून यशश्रीला घराबाहेर पडली. तर अमृता धोंगडे आणि तेजस्विनी लोणारी सेफ झाल्या. आता किरण माने आणि अमृता देशमुख यांच्यापैकी एक सदस्य घराबाहेर पडणार आहे. आता तो सदस्य नेमका कोण असेल ते आज कळेल.

हेही वाचा: Sushmita Sen birthday: लग्न न करताच आई झाली सुष्मिता सेन! अजूनही बॉलीवुडमध्ये दबदबा कायम..

यशश्री घराबाहेर पडल्यानंतर ती एकाही सदस्याला न भेटला घराबाहेर पडली आहे. महेश मांजरेकरांनी तिला न भेटण्याचं कारण विचारलं तेव्हा ती म्हणाली,"घरातून बाहेर पडताना सदस्यांना भेटले असते तर खूप भावूक झाले असते. मला रडायचं नव्हतं त्यामुळे मी कोणाला न भेटता बाहेर पडले".

कालच्या चावडीवर मांजरेकरांनी अमृता धोंगडेची चांगलीच शाळा लावली. तू बाळबोध आहेस म्हणून तिच्यावर निशाणा साधला. तू सतत कोणाशीतरी वाद घालत असतेस. तेसजविणी प्रसादशी बोलते म्हणून तू तिच्याशी बोलणं सोडलं, अत्यंत बालिश आहेस तू, असे मांजरेकर म्हणाले. तर अमृता देशमुख आणि प्रसाद यांच्यावरही निशाणा साधला, तुम्ही ते करताय ते कुणाच्याच लक्षात येत नाही, जे करतायत ते आम्हाला समजेल असं तरी करा.. म्हणत त्यांनाही चुका दाखवल्या.

एरव्ही शनिवारी केवळ चावडी असते, आणि रविवारी एलिमिनेशन. पण काल मात्र शनिवारीच एक सदस्य घराबाहेर पडल्याने सर्वांना मोठा धक्का बसला. पण शनिवारी एक आणि रविवारी एक असे दोन सदस्य घराबाहेर पडणार असल्याचे सांगण्यात आले. आज दूसरा सदस्य घराबाहेर पडेल. पण तो दूसरा सदस्य किरण माने किंवा अमृता देशमुख यांच्यापैकीच एक असणार आहे. त्यामुळे आता किरण माने घराबाहेर पडेल आणि बिग बॉसच्या सांगण्यावरून खेळातून बाहेर न पडता तिथेच एका अज्ञात खोलीत राहून नवा टास्क खेळेल, असा अंदाज प्रेक्षकांनी लावला आहे. आता काय होतंय ते आजच्या भागात कळेलच.

टॅग्स :Big Bossbigg boss marathi