माधवी गोगटे यांचं निधन; 'अनुपमाँ'ची भावूक पोस्ट | Madhavi Gogate | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Madhavi Gogate

माधवी गोगटे यांचं निधन; 'अनुपमाँ'ची भावूक पोस्ट

sakal_logo
By
स्वाती वेमूल

चित्रपट व मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या अभिनेत्री माधवी गोगटे Madhavi Gogate यांचं सेव्हन हिल्स रुग्णालयात कोरोनाने निधन झालं. त्या ५८ वर्षांच्या होत्या. गेला माधव कुणीकडे, भ्रमाचा भोपळा या लोकप्रिय नाटकांमध्ये तसंच घनचक्कर, सत्त्वपरीक्षा, डोक्याला ताप नाही अशा काही मराठी चित्रपटांबरोबरच मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. अलीकडेच त्यांनी 'अनुपमा' Anupamaa या लोकप्रिय हिंदी मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. माधवी यांच्या निधनानंतर कलाविश्वातून शोक व्यक्त होत आहे. 'अनुपमा' मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुलीने Rupali Ganguly सोशल मीडियाद्वारे माधवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या मालिकेत त्यांनी रुपालीच्या आईची भूमिका साकारली होती.

'बऱ्याच गोष्टी बोलायच्या राहून गेल्या.. सद्गती माधवीची', असं लिहित रुपालीने तिच्या भावना व्यक्त केल्या. माधवी यांच्यासोबतचा सेटवरचा फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केला. टीव्ही अभिनेत्री निलू कोहली यांनीसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट लिहित माधवी यांना श्रद्धांजली वाहिली. 'तू आम्हाला सोडून गेलीस यावर माझा विश्वासच नाही. हे जग सोडून जाण्याचं तुझं वय नव्हतं. जेव्हा तू माझ्या मेसेजना रिप्लाय दिला नव्हतास तेव्हा मी फोन करून तुझ्याशी बोलायला हवं होतं. आता मी फक्त पश्चात्तापच करू शकते', असं त्यांनी लिहिलं.

हेही वाचा: 'याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार', महेश मांजरेकरांवर नेटकरी चिडले

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याबरोबर घनचक्कर या चित्रपटात माधवी गोगटे यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. गेला माधव कुणीकडे हे त्यांनी अभिनेता प्रशांत दामलेंबरोबर केलेलं नाटक खूप गाजलं होतं. मराठी रंगभूमीबरोबरच मराठी चित्रपट आणि हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. गेला माधव कुणीकडे, भ्रमाचा भोपळा या गाजलेल्या नाटकांबरोबरच, अंदाज आपला आपला अशा काही नाटकांमध्ये त्यांनी काम केलं. राजा बेटा, सपने सुहाने लडकपन के, कोई अपना सा, ऐसा कभी सोचा न था, एक सफर, बसेरा, कहीं तो होगा अशा काही हिंदी मालिकांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटविली.

loading image
go to top