
'राखीच्या बेडरुमचा Video पाहून व्हाल चकित!' दुबईत घेतलं घर
Rakhi Sawant: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये राखीच्या नावाला वेगळं वलय आहे. ती कायम वादाच्या भोवऱ्यात अडकलेली सेलिब्रेटी आहे. बिग (Bigg Boss) बॉसमधून तिनं मोठ्या प्रमाणावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर तिच्या घटस्फोटाची चर्चा रंगली. राखी ही तिच्या अभिनयापेक्षा वादग्रस्त स्वभावासाठी जास्त चर्चेत असते. आता तिनं (Entertainment news) सोशल मीडीयावर एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये राखीनं तिच्या दुबईतील एका घराचा व्हिडिओ आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट केला आहे. राखीनं आपल्या नव्या घरातील वेगवेगळ्या गोष्टींची माहिती नेटकऱ्यांना दिली आहे.
राखीच्या घरातील इंटेरियर्स हे नेटकऱ्यांना विशेष भावले आहे. त्यांनी राखीचं घर पाहिल्यानंतर तिला वेगवेगळे गंमतीदार प्रश्न विचारुन भंडावुन सोडल्याचे दिसून आले आहे. राखीच्या दुबईतील लक्झरी घरातील व्हीडिओ पाहून नेटकऱ्यांनी तिला हे घर कधी खरेदी केलं असा प्रश्न विचारला आहे. राखीच्या कोणत्याही गोष्टीवर नेटकरी चटकन विश्वास ठेवत नाही. यापूर्वी तिनं बिग बॉसमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले होते. त्यात तिनं एका व्यक्तीला आपला पती म्हणून शो मध्ये निमंत्रित केले होते.
राखीनं शेयर केलेल्या त्या व्हि़डिओची सुरुवात ये तेरा घर ये मेरा घर या गाण्यानं होते. त्यानंतर राखी आपल्या दुबईतील घराची नेटकऱ्यांना ओळख करुन देते. घरातील सजावट दाखवते, बेडरुम, हॉल, किचन हे सारं राखीनं त्या व्हिडिओच्या माध्यमातून नेटकऱ्यांना दाखवत त्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. तुम्ही माझं घर पाहून नक्कीच शॉक व्हाल असं राखीनं म्हटलं आहे. तुम्ही बाकी काही करायचं नाही, दोन बॅगा घ्यायच्या आणि इथं राहायला यायचं. असं राखीनं म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी राखीनं तिच्या बीएमडब्ल्यु गाडीचा व्हिडिओ देखील शेयर केला होता. तिनं सांगितलं होतं की, तिला ही गाडी गिफ्ट म्हणून मिळाली आहे. ज्यावेळी राखीला फोटोग्राफर्सनं एका कारच्या शो रुम बाहेर स्पॉट केले होते तेव्हा तिनंला विचारलं होतं की, तुम्ही गाडी घेण्यासाठी आला आहात का, त्यावर तिनं सांगितलं की, माझ्याकडे एवढे पैसे नाहीत की मी एवढी महागडी कार घेईल.