'फक्त टॉवेल' अन् फोटो क्लिक, संजीदाच्या फोटोशुटनं केला कहर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'फक्त टॉवेल' अन् फोटो क्लिक, संजीदाच्या फोटोशुटनं केला कहर
'फक्त टॉवेल' अन् फोटो क्लिक, संजीदाच्या फोटोशुटनं केला कहर

'फक्त टॉवेल' अन् फोटो क्लिक, संजीदाच्या फोटोशुटनं केला कहर

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून संजीदाच्या त्या फोटोंची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. तिनं केलेलं फोटोशुट चर्चेचा विषय ठरला आहे. काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध अभिनेता रणवीर कपूरचा पहिला चित्रपट प्रसिद्ध झाला होता. त्याचं नाव होतं सावरिया. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये रणबीरनं जो टॉवेल डान्स केला होता. त्याला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. त्यामुळे रणबीर चर्चेतही आला होता. आता संजीदाची चर्चा आहे. तिनं केवळ टॉवेलचा वापर करुन काढलेल्या फोटोंना सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

संजीदाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये तिच्या प्रतिक्रियेलाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आहे. त्याला चाहत्यांनी कमेंट दिल्या आहेत. काही सेकंदाच्या या व्हिडिओला सोशल मीडियावरुन चाहत्यांनी शेयर करण्यास सुरुवात केली आहे. संजीदाचा सोशल मीडियावर अंदाज हा काही औरच असतो. ती सध्याच्या घडीला सोशल मीडिया सेनेन्शन आहे. दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. संजीदा शेखनं खरं तर एक टॉवेल फोटोशुट केलं आहे. तिचं ते बोल्ड टॉवेल फोटोशुट चाहत्यांना कमालीचं पसंद आलं आहे. त्यांनी तिला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही दिल्या आहेत. त्यामुळे संजीदाची लोकप्रियता आणखी वाढली आहे. व्हाईट टॉवेल आणि मोकळी केसांच्या त्या लूकमुळे ती चाहत्यांच्या चर्चेचा विषय आहे.

काही सेकंदाचा तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये अशा प्रकारचे फोटोशुट पहिल्यांदाच नव्हे तर यापूर्वी देखील लोकप्रियतेसाठी संजीदानं फोटोशुट केल्याचे दिसून आले आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, संजीदा स्वताला त्या टॉवेलनं झाकून घेते. संजीदाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाल्यास, तिनं अभिनेता आमिर अलीसोबत लग्न केलं होतं. मात्र आता ते एकमेकांपासून वेगळे झाले आहेत.

हेही वाचा: Movie Review; 'जय भीम' सणसणीत 'चपराक'

हेही वाचा: 'तारक मेहता'च्या' टप्पू - बबिताचं बिंग अखेर फुटलं

loading image
go to top