Urfi Javed: अन् त्याच्यामूळे उर्फी रडली...

Urfi Javed
Urfi JavedEsakal

उर्फी जावेद हिची काही वेगळी ओळख देण्याची गरज नाही. तिला तिच्या नावाने आणि फॅशनमूळे सर्वच ओळखतात. ती नेहमीच बोल्डनेसमूळे चर्चेत असते. तिला कोणी तिच्या फॅशन किंवा कपड्यावरुन बोलंलं तर ती त्याला चांगलीच सूनावतेही. मात्र उर्फीला रडतांना पाहून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

टीव्ही रिअॅलिटी शो 'Splitsvilla 14' गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. हा शो सनी लिओनी आणि अर्जुन बिजलानी होस्ट करतच असले तरी उर्फी जावेदच्या एन्ट्रीनंतर शोचा टीआरपी वाढलेला दिसत आहे. आता या शोमधून उर्फीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती रडताना दिसत आहे.

Urfi Javed
Urfi Javed vs Chetan Bhagat: उर्फीचे फोटो पोरं रात्री बिछान्यात.. तर चेतन भगत बलात्कारा प्रोत्साहन देणारा..

वास्तविक, 'Splitsvilla 14'शोचा एक नवीन प्रोमो व्हिडिओ निर्मात्यांनी शेअर केला आहे. या प्रोमो व्हिडिओमध्ये उर्फी जावेद आणि कशिश ठाकूर एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. कारण उर्फी जावेद आणि कशिश ठाकूर यांची जोडी खूप पसंत केली जात होती. त्याच्यात आता नवीन नातं तयार होइलं असं वाटत असतांनाच हा व्हिडिओ समोर आल्यानंतर उर्फी जावेदच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा: दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

व्हिडीओमध्ये उर्फी जावेद आणि कशिश ठाकूर एकमेकांशी भांडताय आणि नातं तोडत आहेत. शोच्या या प्रोमो व्हिडिओवर त्याचे चाहते सतत कमेंट करत आहेत. उर्फी जावेदने शोमध्ये प्रवेश करताच खळबळ उडवून दिली होती.सुरुवातीलाच तिनं स्पर्धकांसोबत वाद केला आणि कशिशला आपला जोडीदार बनविले होते. एवढेच नाही तर दोघेही अनेकदा एकत्र दिसले होते आणि त्यांच्या जोडीला पसंती दिली जात होती. यादरम्यान उर्फी आणि कशिश ठाकूरचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते मात्र या दोघात आता चांगलच बिनसलेलं दिसतंय. उर्फी त्याच्यासोबत तिचं नात तोडते आणि नंतर जोरजोरात रडत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com