Lock Upp Season 2: कंगनाच्या 'लॉक अप सीझन 2' मध्ये दिसणार 'बिग बॉस 16'ची ही प्रसिद्ध स्पर्धक

अर्चना गौतमला एकता कपूरने तिचा रिअॅलिटी शो लॉक अप सीझन 2 साठी पसंत केले आहे.
Kangana Ranaut
Kangana RanautSakal
Updated on

बिग बॉस 16 संपून 4 दिवस झाले आहेत. शोमधील प्रत्येक सदस्याला काम मिळात आहेत काहींना चित्रपटात, काहींना मालिकांमध्ये. मात्र, बिग बॉसच्या घरात पोहोचलेली अर्चना गौतम या बाबतीत रिकामीच राहिली. तिने घरी अनेक ऑडिशन्स दिल्या पण एकाही ऑडिशन्समध्ये तिची निवड नाही झाली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्चना गौतमला एकता कपूरने तिचा रिअॅलिटी शो लॉक अप सीझन 2 साठी पसंत केले आहे. तिने अर्चनाला आपला शो ऑफर केला आहे. यावर अर्चनाने काय उत्तर दिले हे माहीत नाही, पण कंगनाच्या जेल मध्ये ती दिसणार असल्याची शक्यता आहे. अर्चना आपल्या विधानसभा मतदारसंघात बिकिनी क्वीन या नावाने प्रसिद्ध आहे.

Kangana Ranaut
Urvashi Rautela Naseem Shah : पाकिस्तानच्या नसीमला उर्वशीच्या बर्थ डे शुभेच्छा म्हणते, 'तू मला....'

अर्चना गौतमला बिग बॉस 16 मधील सर्वात मनोरंजक स्पर्धकांपैकी एक म्हणून पाहिले जाते. काही लोक तर तिला विजयी मानत होते. अर्चनाही टॉप 5 मध्ये पोहोचली होती पण नंतर ती बाहेर पडली. आता 'लॉक अप 2' मध्ये बिग बॉसच्या घरातील ही सिलबट्टा गर्ल काय कहर करते, हे येणारा काळच सांगेल, कारण जिथे अर्चना आहे, तिथे वाद होणार नाही असे शक्य नाही.

लॉक अप 2 बद्दल बातमी आहे की ते मार्चच्या मध्यात सुरू होणार आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. गेल्या सीझनचे हॉट टॉपिक कंगना होती. अशा परिस्थितीत तिचं आणि अर्चनाचं नातं कसं असणार हे पाहणंही रंजक ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com