Big Boss 16: ‘हा’ स्पर्धक होणार या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून बाहेर...

Big Boss 16
Big Boss 16Esakal

बिग बॉस16 या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. हा खेळ आता रंगात येत आहे. यात वादविवादच नव्हे तर कधी वातावरण हाणामारी पर्यंत जातं.आठवड्याच्या शेवटी कुणाला तरी हा शो सोडून जावं लागतं. दिलेले टाक्स, परफॉमन्स आणि प्रेक्षकांच्या वोटिंगवर या शोमध्ये कोण राहणार याचा निर्णय होतो.

 गौतम विज, शालीन भानोच, सौंदर्या शर्मा आणि टीना दत्ता या आठवड्यात बिग बॉस 16 मधून बाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. त्यातच गौतम विजला घरातून बेदखल केल्याची बातमी समोर येत आहे. सौंदर्या या आठवड्यात घरातून बाहेर येणार याची सर्वाधिक चर्चेत होती. सोशल मीडियावरही सौंदर्या शर्माच्या नावाची चर्चा रंगली असतांना आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. गौतम विजची या आठवड्यात घरातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याचा बिग बॉस 16 चा प्रवास संपला असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

सोशल मीडियावर गौतमच्या बेघर झाल्याची बातमी ऐकून काही लोक संतप्त झाले आहेत.तर  काही म्हणत आहेत की ते चांगलं झआलं आहे.  त्यांच्याकडे चुरल्या करण्याशिवाय काहीही काम नव्हते. एकानं म्हंटले आहे - चांगले आहे, असाही तो दिवसभर सौंदर्याच्या मांडीवर बसायचा. त्याचबरोबर गौतमच्या काही चाहत्यांनीही या बातमीवर आश्चर्य व्यक्त केले आहे. मात्र, गौतमला या शोमधून बाहेर काढण्यात आल्याची कोणतीही अधिकृत माहिती नाही. 

गौतमची बिग बॉस 16 ची सुरुवात खूप चांगली झाली होती. त्याची सौंदर्या संगसोबतची जवळीकची चर्चाही रंगली होती. पण जेव्हा करण जोहर वीकेंड का वार यामध्ये याला तेव्हा त्याने सांगितले की सौंदर्यासोबतची त्याची जवळीक फक्त कॅमेरापुरती आहे, तो फक्त दिखावा करत आहे आणि त्यानंतर त्याचा खेळ बिघडला.

Big Boss 16
Big Boss 16: शिव ठाकरे स्वत: बिग बॉस बाहेर जाणार?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीना दत्ता आणि गौतम विज यांना सर्वात कमी मते मिळाली आहेत. या कमी मतांच्या आधारे टीना दत्ता काही काळचं शोचा भाग राहू शकते असं बोलले जात आहे. तर दुसरीकडे या शोमध्ये प्रियंका चौधरी, अब्दू रोजिक, शिव ठाकरे आणि अर्चना गौतम या स्पर्धकांना प्रेक्षकांचे सर्वाधिक लोकप्रियता मिळत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com