Bigg Boss 16: अब्दुसोबत केलेल्या अश्लील विनोदावर सलमान भडकला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss 16

Bigg Boss 16: अब्दुसोबत केलेल्या अश्लील विनोदावर सलमान भडकला...

बिग बॉस 16 वादग्रस्त रिअॅलिटी शो सुरू होऊन जवळपास 11 आठवडे झाले आहेत. जस जसं शोचे दिवस संपत आहेत. तसतसं घरातील सदस्य शेवट पर्यंत टिकून राहण्यासाठी प्रयत्न करत आहे. यंदा अब्दु रोजिकने त्याच्या निरागसतेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. त्याचे वागणे त्याचा दिलखूलास अंदाज प्रेक्षकांच मनोरजंन करत आहे मात्र मागील काही दिवसांपासून साजिदने त्याच्यासोबत केलेल्या विनोदामूळं युजर्स चांगलेच संतापले आहे. आता सलमान खानने सूद्धा साजिदला चांगलेच खडे बोल सुनावले.

दरवेळी वीकेंडमध्ये सलमान खान आठवड्याभरात सदस्यांनी केलेल्या चुकां सांगत त्यांची शाळा घेतो. यावेळी सलमान खानचा राग साजिद खानवर निघणार आहे. सलमान खान साजिदला त्याच्या अश्लील विनोदामूळे त्याचा क्लास घेणार आहे.

हेही वाचा: Pathaan: 'काही काळानंतर कपड्यांशिवाय'; दिपिकाच्या भगव्या बिकीनी वादात शक्तीमानची उडी

गेल्या आठवडयात अब्दूला निम्रतला तिच्या वाढदिवसानिमित्त काहीतरी खास करायचं होतं. अशा परिस्थितीत साजिद खान, शिव यांनी अब्दूला निम्रतला त्याच्या अंगावर संदेश लिहून आश्चर्यचकित करण्याची कल्पना दिली. सुरुवातीला साजिद खान अब्दूला खूप वाईट कल्पना देत होता, ज्याला अब्दूने स्पष्टपणे नकार दिला, परंतु निष्पाप अब्दूने निम्रतसाठी त्याच्या शरीरावर संदेश लिहिण्यास तयार केले.

हेही वाचा: Pathaan: हिंदूंच झालं.. आता मुस्लिम भडकले.. दीपिकाच्या बिकिनीच काही खरं नाही..

प्रोमो मध्ये सलमान खान साजिला सांगत आहे निमृतच्या तिच्या वाढदिवसाला वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देण्याची कल्पना अब्दूची नसून खुद्द साजिद खानची होती. नंतर पुन्हा तोच म्हणतो त्याला निमृत कौरपासून दूर राहण्यास सांगतो. साजिद तु स्वतः आग लावतो​​ आणि नंतर स्वतःच विझवतआहेत हे त्यांला समजत नाही.

हेही वाचा: Bigg Boss16: साजिदने अब्दूचे कपडे काढले अन् नेटकऱ्यांनी त्यांची 'लाज'

इतकंच नाही तर अब्दुच्या पाठीवर काय लिहिलं होतं, असा सवालही सलमान खान करणार आहे. त्याने अब्दुलसोबत वाईट विनोद केला होता. ते खूप वाईट होते आणि अशा विनोदांपासून दूर रहा. नुकतचं घरात नॉमिनेशन टास्क झाला तेव्हा प्रियांकाने निमृतसमोर उघडपणे सांगितले की तिचा निमृतशी काहीही संबंध नाही.