Tv celebrity: एजाज आणि पवित्राची “गुपचूप एंगेजमेंट”? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tv celebrity
Eijaz khan
Pavitra Punia

Tv celebrity: एजाज आणि पवित्राची “गुपचूप एंगेजमेंट”?

बिग बॉसच्या घरात अनेक कलाकारांच्या जोड्या जमल्या. घरातुन बाहेर पडल्यावर काहींचे वादही झाले अन् ते वेगळेही झालेत.मात्र काही जोड्या अजूनही एकत्र आहेत.ईशान आणि मायशा, करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश, प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी, रोशेल राव आणि किथ सिक्वेरा आणि त्यांच्यातीलच एक जोडी म्हणजेच एजाज खान आणि पवित्रा पुनिया.

हेही वाचा: Big Boss 4 : या अभिनेत्री घालणार बिग बॉसच्या घरात धिंगाणा

एजाज खान आणि पवित्रा पुनिया अनेकदा त्यांच्या रिलेशनमुळे चर्चेत असतात. बिग बॉसच्या 14व्या सीझनमध्ये त्यांची जवळीक झाली. तेथूनच त्यांच्या लव्ह स्टोरीला सुरवात झाली. बिग बॉसच्या घरातील काही भांडणांमुळे दोघांमधील अंतर वाढले आणि दोघेही वेगळे झाले. मात्र, घरातून बाहेर पडल्यानंतर दोघांनी एकमेकांना वेळ दिला आणि ते एकमेकांना चांगले ओळखू लागले. त्यांनी लिव्ह-इन करण्याचा निर्णयही घेतला. ही दोघ कधी लग्नबधंनात अडकणार याची सर्वच आतुरतेने वाट पहात होते.

हेही वाचा: Bollywood :तमन्ना भाटिया म्हणतेय 'हाय रे मेरा घागरा'...

दरम्यान, पवित्रा पुनियाच्या इस्टांग्राम स्टोरीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. पवित्रा पुनिया तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तिच्या हातातली हिऱ्याची अंगठी दाखवत आहे.त्यात तिने “Whattt!!!!!???” कॅप्शन दिलयं त्यात तिनं काहिच खुलासा केला नसला तरी तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.त्यामूळे दोघांनी गुपचूप एंगेजमेंट केलीय का ... अशा चर्चांना उधान आले आहे.