esakal | लग्न केलं, कोरोना नियमांचा केला भंग, गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Sugandha Mishra and sanket bhosale

लग्न केलं, कोरोना नियमांचा भंग, गुन्हा दाखल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाचा वाढता कहर सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. अशावेळी सर्वांना काळजी घेण्याचे आवाहन शासनानं केलं आहे. दुसरीकडे बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी नागरिकांना घरात सुरक्षित राहण्याचे आवाहनही केले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट धोकादायक ठरताना दिसत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती कठीण झाली आहे. आरोग्य प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. अशात शासनानं काही लग्न समारंभावर काही बंधनं आणली आहेत.

निवडक २५ व्यक्तींच्या उपस्थितीतच लग्न उरकण्याचे आदेश शासनानं दिले आहेत. असे असले तरी अनेकांनी या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे. त्यात प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाल्यास कॉमेडियन सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी कोविडच्या नियमांचा भंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचा फटका त्यांना बसला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाईही करण्यात आली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

बुधवारी रात्री त्या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या लग्नाच्या दरम्यान एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या चर्चेला उधाण आले होते. त्या लग्नामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तो व्हिडिओ जेव्हा पोलिसांच्या हाती लागला तेव्हा त्यांनी या जोडप्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. 26 एप्रिलला सुगंधा आणि संकेतचे लग्न झाले होते. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या 188 नुसार कारवाई करण्यात आले आहे. मात्र अजूनपर्यत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी सांगितले की, कारवाई सुरु आहे.

सुगंधा मिश्रा ही जालंधरची असून संकेत भोसले हा महाराष्ट्रातील आहे. त्या दोघांना द कपिल शर्माच्या शो मधून मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे. त्यानंतर त्यांनी तो शो सोडून दिला. आता ते मुंबईमध्ये राहतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा होती.