शहनाजवर 'भाईजान' फिदा, बॉलीवूडमध्ये होणार दणक्यात एंट्री

बॉलीवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) याची गोष्टच वेगळी आहे.
salman khan and shanaz gill
salman khan and shanaz gill esakal

Bollwood News: बॉलीवूडचा भाईजान सलमान खान (Salman Khan) याची गोष्टच वेगळी आहे. त्यानं आजवर केलेल्या चित्रपटांना खास प्रेक्षकवर्ग मिळाला आहे. त्याचा चाहतावर्गही वेगळा आहे. त्याच्यामुळे कित्येक अभिनेत्रींना बॉलीवूडमध्ये ब्रेक मिळाल्याचे दिसुन आले आहे. (Entertainment news) सलमानची ती वेगळी ओळख आहे. त्यानं आजवर बॉलीवूडमधील (Shehnaz Gill) प्रसिद्ध अभिनेत्रींनी आपल्या चित्रपटांतून संधी दिल्याचे बोलले जाते. आता त्यानं आपला मोर्चा टीव्ही मनोरंजन विश्वावर वळवला असून त्या क्षेत्रातील एक प्रसिद्ध अभिनेत्री त्याच्या पुढील चित्रपटात दिसणार असल्याची माहिती आहे. शहनाज गिल नावाची सेलिब्रेटी अभिनेत्री सलमानसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार असल्यानं तिच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

बिग बॉस 13 पासून लोकप्रिय झालेली शहनाज गिलचा सोशल मीडियावर फॅन फॉलोअर्स मोठा आहे. दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिलची मैत्री ही सर्वांना ठाऊक आहे. गेल्या वर्षी सिद्धार्थ शुक्लाचं हदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं. त्यावेळी त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सिद्धार्थच्या जाण्यानं शहनाजवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यातून तिला बाहेर येण्यासाठी बराच काळ जावा लागला. शहनाजनं मोठ्या हिंमतीनं या प्रसंगाला सामोरं जात पुन्हा मनोरंजन विश्वामध्ये कमबॅक केलं. आता ती सलमान सोबत नव्या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. बॉलीवूडमध्ये नवनवीन अभिनेत्रींना मोठ्या पडद्यावर आणण्यात सलमानचा मोठा वाटा राहिला आहे.

salman khan and shanaz gill
Viral Video: अभिनेता कुणाल खेमुनं खाल्ला बायकोचा मार!

शहनाज ही सलमानच्या 'कभी ईद कभी दीवाली' मधून पदार्पण करणार आहे. इंडिया टूडे प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टमधून ही बातमी समोर आली आहे. सलमान सोबत या चित्रपटामध्ये टॉलीवूडची प्रख्यात अभिनेत्री पुजा हेगडेही दिसणार आहे. सलमानचा मेहुणा आयुष शर्माही या चित्रपटामध्ये झळकणार आहे. त्यानं यापूर्वी सलमानसोबत महेश मांजरेकर दिग्दर्शित अंतिम द फायनल ट्रुथ नावाच्या चित्रपटामध्ये भूमिका केली होती. सलमानच्या या चित्रपटाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. शहनाजच्या भूमिकेबद्दल अद्याप इतर कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही.

salman khan and shanaz gill
Video Viral: रणबीर-आलियाचा लग्नातील 'वरमाला समारंभ' पाहिलात का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com