मानेंना मालिकेतून बाहेर काढण्याचं कारण, निर्मात्यांचा खुलासा| Tv Entertainment Marathi Serial actor Kiran mane case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kiran Mane
मानेंना मालिकेतून बाहेर काढण्याचं कारण, निर्मात्यांचा खुलासा

मानेंना मालिकेतून बाहेर काढण्याचं कारण, निर्मात्यांचा खुलासा

मराठी मनोरंजन (Marathi Entertainment) क्षेत्रामध्ये मुलगी झाली हो (Mulgi zali ho) या मालिकेचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. आता या मालिकेतील अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे कालपासून चर्चेत आले आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांना या मालिकेच्या निर्मात्यांनी यापुढे मालिकेत काम करण्यास नाकारले आहे. माने यांनी या प्रकरणाचे कारण देताना आपण गेल्या काही दिवसांपूर्वी एक राजकीय पोस्ट (Political Post)लिहिली होती. त्याचा परिणाम म्हणून आपल्याला जाणीवपूर्वक बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे सांगितले. त्यांनी एक पोस्ट व्हायरल केली होती. त्यामध्ये सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर (Political Scenerio) पोस्ट त्यांनी केली होती.

यासगळ्यात माने (Mane) यांनी आपल्याला निर्मात्यांनी राजकीय आकसापोटी काढून टाकल्याचे म्हटले होते. आता माझा निर्णय हा प्रेक्षकच करतील. शाहु, फुले आणि आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात काय चालले हे लोकांना कळू द्यावे असे मला वाटते. मी माझ्या पोस्टमध्ये कुणाही राजकीय पक्षाचे अथवा नेत्याचे नाव घेतले नव्हते. तरीदेखील माझ्याबाबत कारवाई करण्यात आल्याचे माने यांनी सांगितलं आहे. आता यासगळ्या प्रकरणावर संबंधित मालिकेच्या निर्मात्यांनी आपली बाजु मांडली आहे. त्यांनी आपण माने यांना कामावर न येण्यास सांगितले याचे कारण व्यावसायिक असल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा: Kiran Mane| चॅनलनी माझ्याशी बोलायला हवं होतं, ही मुस्कटदाबी सहन करणार नाही,ऐका किरण माने काय म्हणतात

याबाबतचे वृत्त बीबीसी मराठी दिलं असून त्यामध्ये निर्मात्यांनी व्यावसायिक कारण पुढे करुन माने यांना मालिकेतून बाहेर काढल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता यावर माने काय बोलणार हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे. आम्ही त्यांना त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे मालिकेतून काढलेलं नाही. त्याचे कारण व्यावसायिक आहे. ती कारणं माने यांना माहिती आहे. असंही निर्मात्यांनी सांगितलं आहे.

हेही वाचा: Kiran Mane| अभिनेते किरण मानेंना सिरियलमधून काढलं ? राजकीय भूमिकांमुळे मालिका गमावली ? पाहा व्हिडीओ

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top