'पैसे द्या सेल्फी घ्या', उर्फीचा अजब - गजब व्हिडिओ व्हायरल|TV Entertainment News Actress Urfi Javed | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

TV Entertainment News Actress Urfi Javed

'पैसे द्या सेल्फी घ्या', उर्फीचा अजब - गजब व्हिडिओ व्हायरल

Urfi Javed Viral Video with her fans: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये आपल्या अभिनयापेक्षा हटक्या स्टाईलनं उर्फीनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आपण जे करु त्याला (Tv Entertainment News) लोकांनी कितीही नावं ठेवली तरी ते ठामपणे करत राहायचे, कुणाचीही पर्वा न करता असं पवित्रा उर्फीचा असतो. बिग बॉस ओटीटीवरुन लोकप्रिय झालेल्या उर्फीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ती पैसे घेउन सेल्फी देत )(Bollywood News) असल्याचे दिसून आले आहे. आपल्या आवडत्या सेलिब्रेटींसोबत फोटो काढणे हे चाहत्यांना आवडते. मात्र उर्फीनं चक्क आपला सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांकडे पैसे मागितल्याचे दिसून आले आहे. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

बिग बॉस ओटीटी मधून उर्फीनं मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ती तिच्या बोल्डनेससाठी देखील ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपासून ती चर्चेत आली आहे. तिच्याकडे वेगवेगळे प्रोजेक्टही सुरु आहेत. मॉडेलिंग म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या उर्फीनं अल्पावधीत स्वताचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडीयावरुन तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. उर्फी मुंबई विमानतळावर आल्याचे कळताच फोटोग्राफर्सनं त्याठिकाणी गर्दी केल्याचे दिसून आले. यावेळी तिच्यासोबत फोटो मिळावा म्हणून चाहत्यांची लगबग सुरु होती. दरम्यान उर्फीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

हेही वाचा: Viral Video:आलिशान कारमधे फिरणारी नोरा नटून थटून स्कूटरवर का गेली?

उर्फीच्या त्या व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अनेकांना तो व्हिडिओ पाहून हसु आवरलेलं नाही. ज्यावेळी तिला काही चाहत्यांनी फोटोसाठी विचारलं तेव्हा तिनं त्यांना पैसै घेतल्याशिवाय सेल्फी नाही असं सांगितलं. मी पहिली सेल्फी फ्री देते. दुसऱ्या सेल्फीला पैसे घेते. असं तिनं सांगितलं. तेव्हा तिला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी तिला काही फोटोग्राफर्सनं गाडी स्वता का चालवत नाही असा प्रश्न विचारला होता. तेव्हा तिनं आपण जर गाडी चालवली तर कुणाला धडकल्याशिवाय राहणार नाही. असं तिनं सांगितलं होतं.

हेही वाचा: Chandramukhi Review: 'नेभळट दौलतराव, रडकी चंद्रकला' - प्रेमाचं पान रंगलचं नाही

Web Title: Tv Entertainment News Actress Urfi Javed Give Money Take Selfie Viral Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top