'आता सहन होत नाही, बास करा!' तेजस्वीच्या बॉयफ्रेंडचा संताप

बिग बॉसचं 15 वं पर्व संपलं तेव्हापासून करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाशच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली.
karan kundra tejasswi prakash
karan kundra tejasswi prakashesakal

Bigg Boss 15 : बिग बॉसचं 15 वं पर्व संपलं तेव्हापासून करण कुंद्रा आणि तेजस्वी (Karan Kundra) प्रकाशच्या नावाची जोरदार (Tejasswi Prakash) चर्चा सुरु झाली. पापाराझ्झींनी तर त्यांना सोडलेच नाही. जाईल तिथे त्यांचा फोटो मिळवण्यासाठी त्यांची धडपड सुरु झाल्याचे अनेकदा दिसून आले आहे. सोशल मीडियावर देखील (Social Media Viral news) या कपल्सची जोरदार चर्चा होती. मात्र आता एक वेगळीच बातमी समोर आली आहे. तेजस्वी प्रकाशच्या बॉयफ्रेंड करणनं फोटोग्राफर्सला चांगलेच झापले आहे. यासंबंधी सोशल मीडियावर ती पोस्ट व्हायरल झाली आहे. फोटोग्राफर्सनं गेल्या काही दिवसांपासून करण आणि तेजस्वीचा फोटोसाठी तर पाठलागच सुरु केला आहे. त्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.

करण आणि तेजस्वी बिग बॉसमधून बाहेर पडल्यापासून ते लाईमलाईटमध्ये आले आहे. या दोन्ही सेलिब्रेंटीवर नेटकऱ्यांचे लक्ष असते. आता करणनं त्यांच्या रिलेशनशिपवरुन केलेलं वक्तव्य चाहत्यांसाठी धक्कादायक ठरताना दिसत आहे. करणचं म्हणणं आहे की, तेजस्वी भलेही माझी गर्लफ्रेंड असेल मात्र तिच्याबद्दल जे कुणी सातत्यानं बोलत आहेत त्यांनी तसे करु नये, आम्हाला आमची स्पेस द्या. ते जास्त महत्वाचे आहे. दरवेळी बातमी आणि फोटोसाठी घराबाहेर थांबणे बंद करा. माझं मत आता तुमच्याबद्दल नकारात्मक झालं आहे. मला आता ते हे सगळं सहन होत नाहीये. मी तर माध्यमाच्या व्यक्तींना विनंती करतो की, ती एक मुलगी आहे तेव्हा काही गोष्टींबाबत संवेदनशीलता जपायला हवी. कॅमेरामन तर या दोन्ही सेलिब्रेटींच्या घरी ताटकळत बसल्याचे दिसून आले आहे. माझ्या घरी गर्दी करुन नका असे आवाहनही त्यानं यावेळी फोटोग्राफर्सला केले आहे.

karan kundra tejasswi prakash
RRR Review- नावं ठेवायचा विषयच नाही, स्टोरी दणदणीत अभिनय खणखणीत

फोटोग्राफर्सपासून बचाव करण्यासाठी तेजस्वीनं आपल्या कारच्या ग्लास या ब्लॅक करुन घेतल्या आहेत. सध्या तेजस्वी ही नागिन 6 च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. आता तर तिच्या त्या मालिकेच्या सेटवर देखील फोटोग्राफर्सनं गर्दी करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे ती चांगलीच वैतागली आहे. बिग बॉसचा 15 वा सीझन संपल्यानंतर तेजस्वी आणि करण कुंद्रा हे दोन्ही सेलिब्रेटी लोकप्रिय झाले. त्यांच्या रिलेशनशिपची चर्चाही सुरु झाली होती. आता ते मीडियाच्या वाढणाऱ्या हस्तक्षेपामुळे त्रस्त झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com