Shweta Tiwari: चूक झाली, श्वेताच्या घटस्फोटीत पतीला आलं रडू! |Tv Entertainment Raja Chaudhary cried | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shweta Tiwari raja chaudhary news

Shweta Tiwari: चूक झाली, श्वेताच्या घटस्फोटीत पतीला आलं रडू!

Raja Chaudhary on Shweta Tiwari & Palak Tiwari: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये लोकप्रिय असलेल्या श्वेता तिवारीच्या प्रकरणाविषयी सगळ्यांना माहिती आहे. तिचा पूर्वाश्रमीचा पती राजा चौधरी याची एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. असं म्हटलं जातंय की, त्यानं आपल्या प्रतिक्रियेतून जे झालं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त (tv entertainment news) केली आहे. आपल्याकडून झालेल्या चूकीचा त्याला पश्चाताप होत असल्याचे त्यानं म्हटले आहे. श्वेता तिवारी तिची मुलगी पलक तिवारी सध्याच्या घडीला सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणाऱ्या सेलिब्रेटी (social media viral news) आहेत. श्वेतानं यापूर्वी केलेल्या पोस्टमधून पतीनं आपल्यावर काय अन्याय केला याविषयी सांगितले होते.

राजा चौधरी म्हणतो, घटस्फोटानंतर मी पूर्णपणे एकाकी झालो आहे. आता मला माझी चूक समजली आहे. मी जेव्हा माझ्या मुलीशी पलकशी बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती मला टाळण्याचा प्रयत्न करते. पलक तिवारीच्या बॉलीवूड डेब्युची जोरदार चर्चा आहे. त्यात श्वेतानं एका मुलाखतीमध्ये घटस्फोटीत पती राजा चौधरीविषयी धक्कादायर खुलासे केले होते. त्याच्याकडून होणारी मारहाण, शिवीगाळ यामुळे आपण त्रस्त झालो होतो. असे तिने म्हटले होते. दुसरीकडे राजानं देखील एका मुलाखतीतून घटस्फोट झाल्यानंतर आपण दारुच्या आहारी गेल्याचे म्हटले आहे.

राजा चौधरीनं टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की, मी सध्या दारु सोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपचार घेत आहे. सध्या एका वेगळया परिस्थितीतून मी जात आहे. अस्वस्थ झालो आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या एक्स गर्लफ्रेंड श्रद्धा शर्मानं देखील त्याच्याविषयी वेगळी प्रतिक्रिया दिली होती. ती म्हणाली होती की, तो दारुच्या आहारी गेला आहे. त्यामुळे तो शिवीगाळ करतो. हिंसक होतो. त्याचा परिणाम आमच्या नात्यावर झाला आहे. त्यामुळे मला त्याच्यासोबत आता राहायचे नाही.

हेही वाचा: Ranveer Singh: 'न्युड फोटोग्राफी' वरुन 14 वर्षे कोर्ट कचेरी करणाऱ्या मिलिंदचा पाठींबा

श्वेता तिवारीसोबतच्या रिलेशनशिपवर राजा म्हणतो की, मी बऱ्याचवेळा श्वेताशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र तिनं माझा नंबर ब्लॉक केला आहे. जेव्हा आम्ही वेगळे झालो तेव्हा श्वेताला आधार मिळाला मला मात्र नाही. माझी आणखी कुणाला डेट करण्याची इच्छा आहे. मात्र ती व्यक्ती मला डेट करण्यात उत्सुक नाही. याचे कारण माझी सध्याची परिस्थिती वाईट आहे.

हेही वाचा: Mumtaz: 'मुमताज आणि यश चोप्रा यांचं...' पत्नी पामेलाचा गौप्यस्फोट

Web Title: Tv Entertainment Raja Chaudhary Cried Remembering Shweta Tiwari Palak Tiwari

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top