बाबाजीचा दुट्टपीपणा, बबिताचा बोल्डनेस प्रेक्षकांना भावला?, नेटकरी म्हणतात...|Tv Entertainment Web Series Aashram 3 Bobby Deol | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tv Entertainment Web Serise Aashram 3

बाबाजीचा दुट्टपीपणा, बबिताचा बोल्डनेस प्रेक्षकांना भावला?, नेटकरी म्हणतात...

Entertainment News: ओटीटीवर सर्वाधिक लोकप्रिय झालेली मालिका म्हणून (OTT News) दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या आश्रम या मालिकेचं नाव सांगता येईल. आतापर्यत या मालिकेच्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला (Bollywood News) होता. नुकताच या मालिकेचा तिसरा भाग प्रदर्शित झाला आहे. त्याला नेटकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आश्रम ही एका सत्य (Aashram Web Serise) घटनेवर आधारित मालिका असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्याबाबत मोठ्या प्रमाणावर वाद झाले आहे. त्यावरुन दिग्दर्शक प्रकाश झा यांना मारहाण झाली होती. बाबा निरालाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या करामती (Prakash Jha) यानिमित्तानं समोर आल्यानं प्रेक्षकांना आश्रम मालिका प्रचंड भावली आहे.

एम मॅक्स प्लेयरवर प्रदर्शित झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या दोन्ही सीझनला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता. सोशल मीडीयावर देखील बाबा निराला आणि त्याची प्रियसी बबिता यांच्या नावावरुन वेगवेगळ्या प्रकारचे मीम्स व्हायरल झाले असून त्याची चर्चा आहे. नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांना आलेले उधाण हा देखील खास चर्चेचा विषय आहे. बॉबी देओल याची मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांना आवडली आहे. ही मालिका वास्तविक आयुष्यातील एका घटनेवर आधारित असून त्यात एका बाबाजीचे नाव समोर आल्यानं काही भक्तांमध्ये नाराजीचा सूर असल्याचेही दिसून आले होते.

आज या मालिकेचा तिसरा सीझन प्रदर्शित झाला असून तो पाहिल्यावर प्रेक्षकांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. त्यापैकी काहींनी या मालिकेचं कौतुक केलं आहे. अनेकांनी ईशा गुप्ता आणि बाबाजीच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. त्यांची तोंड भरुन स्तुतीही केली आहे. ज्यांनी तिसऱ्या सीझनकडून अधिक बोल्डनेस आणि उत्सुकतेची अपेक्षा केली होती त्यांना दिग्दर्शकानं नाराज केलेलं नाही. हे यानिमित्तानं दिसून आले आहे. बाबाजीच्या जपनामचे प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. काहींनी हा बहुप्रतिक्षित सीझन पाहण्यासाठी आपण उत्सुक असल्याचे म्हटले आहे. एका युझर्सनं लिहिलं आहे की, नवा सीझन देखील कमाल आहे. बॉबी देओलच्या भूमिकेचं कराव तेवढं कौतुक कमीच आहे.

हेही वाचा: 'बूढ़ा' कमेंटवरुन 'कपिल शर्मा शो' मध्ये घडलं रामायण? कमल हासनचा Video Viral

दुसरीकडे काही चाहत्यांना आश्रम मालिका भावलेली नाही. त्यांनी त्यात काही गोष्टींवर बोट ठेवले आहे. त्यांना त्यामध्ये पूर्वीच्या सीझनमध्ये जसे लक्षवेधी संवाद होते तसे या भागात नसल्याची खंत व्यक्त केली आहे. केवळ बोल्डनेस आहे. बाकी कथेत विशेष असा जीव नसल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा: Viral Video: चक्क 5 स्टार हॉटेलमध्ये काम करतो 'हा' कुत्रा; दर महिन्याला मिळतो खास पगार

Web Title: Tv Entertainment Web Series Aashram 3 Bobby Deol Esha Gupta Public Review Social Media Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top