Urfi Javed Tweet: 'चित्राजी संजय आठवतो का?' उर्फीनं चित्रा वाघ यांची कुंडलीच काढली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed Tweet

Urfi Javed Tweet: 'चित्राजी संजय आठवतो का?' उर्फीनं चित्रा वाघ यांची कुंडलीच काढली

बिग बॉस फेम आणि टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी उर्फी ही तिच्या अतरंगी फॅशनमुळं चर्चेत असते. त्याचबरोबर तिच्या या फॅशनमुळं ती ट्रोलही होते. गेल्या काही दिवसांपासून उर्फीची फॅशन पाहिल्यानंतर भाजपच्या चित्रा वाघ प्रचंड संतापल्या आहेत. काही झालं तरी पोलिसांनी उर्फीवर कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. इतकचं नाही तर ती दिसल्यावर तिच्या कानशिलात वाजवणारं असल्याचही त्यांनी सांगितलं.

ही झाली चित्रा वाघ यांची बाजू ,मात्र उर्फीही काही कमी नाही. तिनेही चित्रा वाघ यांना आव्हान दिलं. चित्रा वाघ यांनी त्यांची संपत्ती उघड केल्यास जेलमध्ये जाण्यास तयार आहे असल्याचं उर्फीनं सांगितलं. तिने इंस्टाग्राम स्टोरी टाकत तिने चित्रा वाघ यांच्यावर निशाना साधला. त्यानंतर वारंवर उर्फीनं काही पोस्ट करत चित्रा वाघ यांच्यावर प्रश्नाचा भडिमार केला.

हेही वाचा: Urfi Javed: "तुमच्या कामांकडे लक्ष द्या",चित्रा वाघ यांच्या पोस्टला उर्फीचा कडक रिप्लाय

आता पुन्हा उर्फीनं ट्विट करत चित्रा वाघ यांना डिवचलं. उर्फीने तिच्या अकाऊंटला पोस्ट करत लिहिलं की, "चित्रा वाघ यांच्यासोबत मैत्री करण्यासाठी उत्सूक आहे. भाजप पक्षात प्रवेश घेण्यापुर्वी चित्राजी तुम्हाला संजय (संजय राठोड) आठवतो का? भाजपात प्रवेश केल्यानंतर तर तुमची खुप जवळची मैत्री झाली होती. तुम्ही तर त्याच्या सर्व चुका विसरुन गेल्यात ज्यासाठी एनसीपीमध्ये गोंधळ घातला होता."

तिच्या टिव्ट्मध्येही बरीच तफावत असली तरी तिला म्हणालयचं की, जेव्हा संजय राठोड हे मविआचा भाग होते तेव्हा चित्रा वाघ या त्यांच्या विरुद्ध लढाई लढण्यासाठी जीवाचं रान केलं मात्र आता संजय राठोड हे शिवसेनेच्या शिंदे गटात सामिल झाले असून भाजपाच्यासोबत मंत्रीही झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या शिंदे गट आणि भाजपचं सरकार असल्यानं त्यांनी पुन्हा संजय राठोड यांच्या विरोधात काहीही कारवाई करण्याची मागणी का केली नाही? असा सवाल उपस्थीत

हेही वाचा: Urfi Javed: राजकीय नेत्यांनाच नाही तर या सेलिब्रिटींनाही उर्फीनं दिलाय दणका..

या पोस्टच्या माध्यमातुन उर्फीने चित्रा वाघ यांना संजय राठोड यांची आठवण करुन दिली. पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोडांवर जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांचा राजीनामा मागण्यासाठी चित्रा वाघ ताकदीने मैदानात उतरल्या. त्यांचा राजीनामा घेतला जावा, यासाठी सरकारवर टीका करत राहिल्या, सरकारवर सतत दबाव टाकत राहिल्या.संजय राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणात क्लिनचिट मिळाली आहे.

टॅग्स :Bollywood NewsChitra Wagh