esakal | बालकलाकार  ते 'अनुपमा'; रुपाली गांगुलीचा रंजक प्रवास 

बोलून बातमी शोधा

rupali ganguly

वयाच्या सातव्या वर्षापासून अभिनय; बिग बॉसमध्येही घेतला होता भाग

बालकलाकार  ते 'अनुपमा'; रुपाली गांगुलीचा रंजक प्रवास 
sakal_logo
By
स्वाती वेमूल

गेल्या काही महिन्यांपासून मालिकाविश्वात आपलं वर्चस्व गाजवणारी मालिका म्हणजे 'अनुपमा'. स्टार प्लस वाहिनीवर प्रसारित होणारी मालिका टीआरपीच्या यादीत अग्रस्थानीच असते. या मालिकेत अनुपमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुपाली गांगुली घराघरात लोकप्रिय झाली आहे. ती या मालिकेत सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून तिने अभिनयाला सुरुवात केली. या ३५ वर्षांपासून रुपाली चित्रपट आणि मालिकांमध्ये सक्रिय आहे. 

रुपालीचे वडील अनिल गांगुली हे चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. रुपाली बालकलाकार म्हणून १९८५ मध्ये वडिलांच्याच चित्रपटातून पदार्पण केलं. त्यानंतर ती 'बलिदान' या चित्रपटात झळकली. तर २००० मध्ये रुपालीने 'सुकन्या' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पहिलं पाऊल ठेवलं.  या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती. मात्र २००३ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'संजीवनी' या मालिकेत डॉक्टर सिमरनच्या भूमिकेमुळे तिला खरी ओळख मिळाली. यासाठी तिला इंडियन टेली अवॉर्ड्ससाठी नामांकन मिळालं होतं. 

रुपालीने २००४ पासून २००६ पर्यंत 'साराभाई वर्सेस साराभाई' या मालिकेत काम केलं. यामध्ये तिने मोनिषा साराभाईची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठीसुद्धा तिला सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्रीचं इंडियन टेली अवॉर्ड्सचं नामांकन मिळालं होतं. याशिवाय तिने एकता कपूरच्या 'कहानी घर घर की' या मालिकेत गायत्री अग्रवालची भूमिका साकारली होती. रुपालीने 'काव्यांजली', 'बा बहू और बेबी', 'परवरिश' या मालिकांमध्येही काम केलं. 

हेही वाचा : दत्तक घेतलेल्या मुलीबाबत आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला मंदिरा बेदीने सुनावलं 

मालिकांशिवाय रुपालीने रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला होता. 'बिग बॉस' या वादग्रस्त रिअॅलिटी शोच्या पहिल्या पर्वात ती झळकली होती. तर २००९ मध्ये तिने 'खतरों के खिलाडी'च्या दुसऱ्या सिझनमध्ये भाग घेतला होता.