
Indian shows which have been banned in Pakistan: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद कोणापासून लपलेला नाही. दोन्ही देशांमधील संबंध फारसे चांगले नाही. धार्मिक वाद असो किवां यूद्ध अनेक कारणांवरुन दोघीं देशांच्या संबधावर परिणाम झालेला दिसतोय. पाकिस्तानी चित्रपट 'द लिजेंड ऑफ मौला जट' आणि सेवक-द कन्फेशन' या नव्या मालिकेबाबत भारतात बराच गदारोळ सुरू झाला आहे. यांना भारतात बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. मात्र तुम्हाला माहित आहे का पाकिस्तानमध्ये अनेक भारतीय टीव्ही मालिका आणि रिअॅलिटी शोवर बंदी घालण्यात आली आहे. चला तुम्हाला त्या मालिकांचे नाव आणि त्यांच्या बंदीचे कारण सांगतो.
बिग बॉस :
'बिग बॉस' हा भारतातील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शोपैकी एक आहे. सलमान खानच्या या रिअॅलिटी शोचे आतापर्यंत 16 वा सीझन आहेत आणि मात्र, पाकिस्तानमध्ये या शोवर बंदी घालण्यात आली आहे. शोमध्ये बोलली जाणारी असभ्य भाषा आहे आणि शोमध्ये सेलेब्स स्पर्धक म्हणून दिसतात. अनेकवेळा त्यांच्यात वाद होतात, त्यामुळे सेलिब्रिटींमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारने या शोवर बंदी घातली आहे.
'नागिन':
'नागिन', ही भारतातील लोकप्रिय मालिका आहे. या शोमध्ये अनेक अभिनेत्री नागिनच्या भूमिकेत दिसल्या आहे. या शोचा टीआरपीही चर्चेत असते. इतकंच नाही तर पाकिस्तानमध्येही हा शो खूप पसंत केला जात होता. या मालिकेचा पहिला सीझन पाकिस्तानमध्ये प्रसारित करण्यात आला होता परंतु सीझन 1 नंतर, पाकिस्तान सरकारने दुसरा सीझन रिलीज होण्याच्या 2 दिवस आधी त्यावर बंदी घातली.
हेही वाचा: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?
'भाबी जी घर पर है':
'भाबी जी घर पर है' ही एक कॉमेडी मालिका आहे, ज्यामध्ये शिल्पा शिंदे यांनी अंगूरी भाभीची भूमिका साकारली होती. पण आता शुभांगी अत्रे ही भूमिका साकारत आहे. या मालिकेत अशा दोन शेजाऱ्यांची कथा दाखवण्यात आली आहे, जे एकमेकांच्या पत्नीकडे जास्त लक्ष देतात. भारताच्या म्हणण्यानुसार या शोची संकल्पना एकदम ठीक आहे पण पाकिस्तानने या शोवर बंदी घातली आहे.
'कुबूल है':
सुरभी ज्योती आणि करण सिंग ग्रोवर स्टारर सीरियल 'कुबूल है' 2012 ते 2016 या कालावधीत प्रसारित झालेली लोकप्रिय मालिका होती. या मालिकेच्या कथेत एक भारतीय मुस्लिम कुटुंब दाखवण्यात आलं होतं. पण पाकिस्तानमध्ये या शोवरही बंदी घालण्यात आली होती. भारतीय छोट्या पडद्यावर मुस्लिम समाजावर आधारित नवीन कथा सुरू करण्याचे श्रेय या मालिकेलाच दिले जाते.
'मे आय कम इन मॅडम':
'मे आय कम इन मॅडम' ही कॉमेडी मालिका होती, जी भारतात खूप प्रसिद्ध झाली होती. शोचा कंटेंट खराब असल्याचं सांगत या मालिकेवर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली होती.
थपकी-प्यार-की:
थपकी हे टोपणनाव असलेल्या मुलीवर आधारित ही मालिका होती ज्यात ती बोलतांना अटकते, तरीही जीवनातील सर्व आव्हाने सकारात्मक दृष्टीकोनातून स्वीकारते. ती नोकरी शोधण्यासाठी आणि स्वतंत्रपणे जगण्यासाठी शहरात राहते. या शोलाही पाकिस्तानात बंदी आहे.
ये है मोहब्बतें:
या शोमध्ये दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल या प्रसिद्ध टेलिव्हिजन कलाकारांपैकी एक आहेत . यात एका महिलेची कहाणी आहे जी मुलीच्या जवळ जाण्यासाठी एका मूलीच्या वडिलांशी लग्न करते. जेव्हा पतीची माजी पत्नी समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिचे जीवन बदलते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.