'भारताविरुद्धचा प्रोपगंडा शो' म्हणत पाकिस्तानी सीरीजवरून जोरदार राडा, भारतात बंदीची मागणी Pakistani Web Series | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistani Web Series Sevak The Confession

Pakistani Web Series: 'भारताविरुद्धचा प्रोपगंडा शो' म्हणत पाकिस्तानी सीरीजवरून जोरदार राडा, भारतात बंदीची मागणी

Pakistani Web Series Sevak The Confession: भारत आणि पाकिस्तानमधील चित्रपटावरील वाद काही थांबायचं नावं घेत नाही आहे. पाकिस्तानी चित्रपट 'द लिजेंड ऑफ मौला जट' जगभरात लोकप्रिय झाला आहे.पण हा भारतात प्रदर्शित होण्यावरुनही वाद आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अमेय खोपकर यांनी हा चित्रपटाला भारतात प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी धमकीच दिली आहे. त्यातच आता पाकिस्तानच्या 'सेवक-द कन्फेशन' या नव्या मालिकेबाबत भारतात बराच गदारोळ सुरू झाला आहे.

हेही वाचा: Fawad Khan या पाकिस्तानी अभिनेत्याचा सिनेमा भारतात रिलीज करण्यावरनं खळबळ, मनसेनं घेतला आक्रमक पवित्रा..

'सेवक-द कन्फेशन'बाबत लोकांचा संताप ट्विटरवर स्पष्टपणे दिसत आहे. लोक याला भारताविरुद्धचा प्रोपगंडा शो असं म्हणू लागले आहेत. या मालिकेतून समाजातील हिंदूंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. पाकिस्तानचे प्रसिद्ध लेखक साजी गुल यांनी या मालिकेचं लेखन केलं आहे.तर अंजुम शहजाद यांनी निर्मिती केली आहे. 'सेवक-द कन्फेशन' ही मालिका पाकिस्तानी OTT प्लॅटफॉर्म vidly.tv वर रिलीज झाली आहे. ही मालिका 8 भागांची आहे. त्याचे 2 भागही यूट्यूबवर अपलोड करण्यात आले आहेत.

हेही वाचा: सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?

पाकिस्तानी सिरीज 'सेवक-द कन्फेशन'चं कथानकात नेमक काय?

भारतातील 1984 च्या दंगलीपासून ते गुजरात दंगल आणि अयोध्या वादापर्यंत या सीराज दाखवण्यात आलं आहे. या घटनांद्वारे भारत आणि हिंदूंबद्दल द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या मालिकेत दीप सिद्धू, हेमंत करकरे, गौरी लंकेश आणि जुनैद खान यांच्या आयुष्याची झलकही पाहायला मिळतेय.

एकूणच 'सेवक-द कन्फेशन' या मालिकेतून हिंदूंविरुद्ध अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानंतर या मालिकेला विरोध होत असून त्यावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.पाकिस्तानी मालिका 'सेवक-द कन्फेशन' 26 नोव्हेंबर रोजी रिलीज झाली आहे. त्याचे 2 एपिसोड्स यूट्यूबवरही टाकण्यात आले आहेत, जे पाहिल्यानंतर यूजर्स ट्विटरवर नाराज होत आहेत. 'सेवक-द कन्फेशन' या पाकिस्तानी मालिकेबद्दल भारतातील लोकांच्या मनात प्रचंड संताप आहे.

हेही वाचा: Bigg Boss 16: सलमानचा जलवा अन् स्पर्धकांचे राडे! बिग बॉसने केली रेकॉर्ड ब्रेक कमाई

युजर्स याला स्वस्त प्रचार म्हणत आहेत. त्याच वेळी, काही लोकांना ही सिरिज समजली नसून लोक त्याला विनोदी मालिका म्हणत आहेत. लोक म्हणतात की तुम्हाला प्रचार करायचा असेल तर तुम्ही आधी चांगलं काम करायला शिका.