TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या सेटवर अपघात; चंपक चाचांना गंभीर दुखापत...

TMKOC
amit bhatt
champak chacha
TMKOC amit bhatt champak chachaEsakal
Updated on

'तारक मेहता का उल्टा चष्मा' हि लोकप्रिय मालिका आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वच वर्ग या शोचा चाहता आहे. मात्र या कॉमेडी शोच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. केवळ जेठा आणि दया चं नाही तर गोकुळधाम सोसायटीच्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. अशा परिस्थितीत जेठाच्या वडिलांची भूमिका करणारे 'चंपक लाल' म्हणजेच अमित भट्ट यांना सेटवर दुखापत झाली आहे.

खरं तर, मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की सर्वांचे आवडते चंपक चाचा उर्फ अमित भट्ट सेटवर जखमी झाले आहे. इतकचं नाही तर या दुखापतीमुळे ते अनेक दिवस शोमध्ये दिसणार नसल्याचंही बोललं जात आहे.

हेही वाचा: का आहे जैन आणि हिंदु धर्मियांत साहचर्य?

'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या स्क्रिप्टनुसार एका सीनमध्ये चंपक चाचाला पळायचं होतं. या सीनच्या शूटिंगदरम्यान अमित भट्ट उर्फ चंपक चाचा धावताना त्याचा तोल गेला आणि ते खाली पडले. पडल्यामूळे अमित यांना गंभीर जखमी झाली आहे. डॉक्टरांनी अमित भट्ट यांना बेड रेस्टचा सल्ला दिला आहे. शोच्या निर्मात्यांनीही त्याला विश्रांती घेण्यास सांगितले आहे. यामुळेच चंपक चाचा सध्या शोचे शूटिंग करत नाही आहे.

चंपक चाचांच्या दुखापतीची बातमी समोर आल्यापासून त्याचे चाहते काळजीत पडले आहे. त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी ते प्रार्थना करत आहे. तसेच शोचे इतर कलाकारही अमित लवकरात लवकर बरे होऊन शोच्या सेटवर परत यावे अशी इच्छा व्यक्त करत आहेत.

TMKOC
amit bhatt
champak chacha
Mayur Vakani: 'तारक मेहता फेम दयाबेनच्या भावाचा गुजरात निवडणुकीत हातभार; केलं...

'तारक मेहता का उल्टा चश्मा' शो टिव्हिवरील सर्वात दिर्घकाळ चालणारा शो बनला आहे. नुकतच या शोने 14 वर्ष पुर्ण केले आहे. या शोचा चाहता वर्ग फार मोठा आहे. प्रेक्षक या शोचे जुने एपिसोडही आवडीने पाहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com