TVF founder Arunabh Kumar: 'पंचायत सीरिज'चे निर्माते अर्णभ कुमार यांना कोर्टाचा दिलासा!

कोटा फॅक्टरी, पंचायत, पिचर्स सारख्या मालिकांमधून देशातील तरुणाईच्या मनाचा वेध घेणाऱ्या टीव्हीएफवर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
TVF founder Arunabh Kumar
TVF founder Arunabh Kumaresakal
Updated on

TVF founder Arunabh Kumar tv entertainment : कोटा फॅक्टरी, पंचायत, पिचर्स सारख्या मालिकांमधून देशातील तरुणाईच्या मनाचा वेध घेणाऱ्या टीव्हीएफवर प्रेम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गेल्या काही वर्षांपासून टीव्हीएफच्या जेवढ्या मालिका आल्या आहेत. त्यासगळ्याच लोकप्रिय झाल्या आहेत. त्या निर्मिती कंपनीच्या अर्णभ कुमार यांच्याशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे.

अर्णभ कुमार यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला होता. २०१७ साली झालेल्या या प्रकारावरुन सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली होती. याप्रकरणात आता कुमार यांना उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. याशिवाय कोर्टानं याप्रकरणात पोलिसांना देखील फटकारले आहे.

Also Read - क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यात केलेला उशीर आणि त्यावरुन त्यांनी दिलेली कारणं ही समर्थनीय नसल्याचे कोर्टानं म्हटले आहे. गेल्या काही वर्षांपासून या प्रकरणानं मनोरंजन विश्वाचे लक्ष वेधून घेतले होते. सोशल मीडियावरील कंटेट बदलण्यात आणि मनोरंजनाची व्याख्या बदलून टाकण्यात टीव्हीएफचा वाटा महत्वाचा होता. त्यांनी स्वताची वेगळी ओळख निर्माण केल्याचे दिसून आले.

TVF founder Arunabh Kumar
Gautami Patil Interview : 'लोकांना कसं सांगू जशी गाणी वाजणार तशी मी नाचणार'! गौतमीची अनकट् मुलाखत वाचा

कुमार यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे व्यावसायिक दृष्टीकोनातून करण्यात आल्याचे निरिक्षण कोर्टानं नोंदवले आहे. २०१७ मध्ये टीव्हीएफ या निर्मिती कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका तरुणीनं कुमार यांच्या विरोधात तक्रार केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com